Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs PAK : भारत विरुद्ध पाक सामना कधी, कुठे पाहायचा, जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

Icc Champions Trophy 2025 IND vs PAK: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना होत आहे. या सामन्याची सर्वचजण वाट पाहत होते. हा सामना कधी आणि केव्हा सुरु होईल कुठे पाहता येईल याची सर्व माहिती खास क्रीडा रसिकांसाठी देत आहोत.

तत्पुर्वी बांगलादेशचा पराभव करत टीम इंडियाने शानदार सुरुवात केली आहे. पण अजूनही अनेक महत्वाचे टप्पे पार करायचे आहेत. त्यापैकी एक म्हणजे पाकिस्तानविरुद्धचा हायव्हॉटेज सामना. चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात पाक संघाची सुरुवात खराब झाली आहे. ग्रुप अ मध्ये पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात पाकच्या संघाला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे.

पाकिस्तानसाठी हा सामना 'करो या मरो' असा असेल. जर टीम इंडियाने या सामन्यात पाकिस्तानी संघाचा पराभव केला तर टीम इंडियाचे सेमीफायनलचे तिकीट जवळजवळ निश्चित मानले जाऊ शकते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल.

IND vs PAK

यजमान पाकिस्तानचा संघ पहिल्या फेरीत बाहेर पडू नये म्हणून ते टीम इंडियाविरुद्ध सर्वोत्तम प्रयत्न करताना दिसतील, परंतु टीम इंडियाचा पराभव करणे इतके सोपे काम नाही. कारण टीम इंडियाचा कर्णधार रोहीत शर्मा, शुभम गिल, के. एल राहूल, मोहम्मद शम्मी फॉर्मात परतले आहेत.

गेल्या वेळी निकाल काय होता?

गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान दोनदा आमनेसामने आले होते. पहिल्यांदाच हा लीग स्टेज सामना होता आणि टीम इंडियाने तो जिंकला होता. यानंतर अंतिम सामना खेळवण्यात आला. 2017 मध्ये हा अंतिम सामना जिंकून पाकिस्तानने विजेतेपद पटकावले. यावेळीही दोन्ही संघांमध्ये कठीण स्पर्धा अपेक्षित आहे आणि सामना कोणत्याही दिशेने जाऊ शकतो.

भारत-पाकिस्तान सामना कधी आहे?

संपूर्ण जगाचं लक्ष असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील दुसरा सामना हा भारत विरुध्द पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना 23 फेब्रुवारी रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता (09:00 GMT) दुबई येथे होणार आहे. दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी कराची येथील राष्ट्रीय स्टेडियमवर स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजता (09:00 GMT) पाकिस्तान विरुध्द न्यूझीलंड या सामन्याने सुरु होणार आहे.

Champions Trophy 2025: भारत-पाक सामना मोफत कुठे पहायचा

क्रिकेट चाहते स्टार स्पोर्ट्स आणि नेटवर्क 18 वाहिन्यांवर दुपारी 2:00 वाजता (IST) सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. ऑनलाइन स्ट्रीमिंग पसंत करणाऱ्यांसाठी JioHotstar अॅप आणि वेबसाइट एकाच वेळी लाईव्ह कव्हरेज प्रदान करतील. तुम्ही जिओ हॉटस्टारवर भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+