पाकिस्तानी खेळाडूंनी मर्यादा ओलांडल्या! हात न मिळवल्याच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी 'गलिच्छ' डाव
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वीच पाकिस्तानी संघाची अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येत आहे. आशिया कप 2025 च्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा अवघ्या 15.5 षटकांत धुव्वा उडवला होता. 128 धावांचे लक्ष्य भारतीय खेळाडूंनी सहज गाठले. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हात मिळवण्यासही नकार दिला आणि थेट ड्रेसिंग रूममध्ये गेले.

या पराभवाच्या आणि अपमानाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानी खेळाडूंनी आता मैदानाबाहेर 'गलिच्छ' खेळी सुरू केली आहे. सराव सत्रादरम्यान, त्यांनी '6-0, 6-0' असे नारे देऊन भारतीय संघाला डिवचण्याचा प्रयत्न केला.
पाकिस्तानी संघाची मर्यादाबाह्य कृती
हे नारे पाकिस्तान सरकारने केलेल्या एका खोट्या दाव्याशी संबंधित आहेत. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारताची 6 लढाऊ विमाने पाडली, असा पाकिस्तानचा दावा होता, तर प्रत्यक्षात भारताने पाकिस्तानचे 11 हवाई तळ (एयरबेस) उद्ध्वस्त केले होते.
पाकिस्तानात भारताची दहशत
वास्तविक पाहता, पाकिस्तानच्या संघाकडे आता कोणतीही प्रभावी रणनीती शिल्लक नाही. त्यामुळेच ते आता नारेबाजी आणि खालच्या पातळीवरची कृती करत आहेत. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, हा विजय शहीद जवानांना आणि पहलगाम हल्ल्यातील पीडितांना समर्पित असेल. दुसरीकडे, लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा गेल्या सामन्यातील पारितोषिक वितरण सोहळ्यालाही उपस्थित न राहता पळून गेले होते.
आजचा सामना 7-0 च्या विक्रमासाठी
पाकिस्तानी खेळाडूंसाठी हा सामना 'करो या मरो' असा असला तरी, भारतासाठी ही आणखी एका विजयाची संधी आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहिल्यास, भारताने पाकिस्तानविरुद्ध 6-0 असा विक्रम आधीच नोंदवला आहे आणि आज हा विक्रम 7-0 करण्याची शक्यता आहे. पाकिस्तान मैदानात भारताचा सामना करण्यास असमर्थ ठरत आहे. दोन्ही फॉरमॅटमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्धचे मागील सहाही सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंनी कितीही खालच्या पातळीवरची रणनीती वापरली तरी रविवारच्या सामन्यात भारत आपला 7-0 चा विक्रम निश्चितच पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
संभाव्य संघ
भारतीय संघ: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, जितेश शर्मा, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती.
पाकिस्तानी संघ: सईम अयूब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हारिस (विकेटकीपर), फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), खुशदिल शाह, हसन नवाज, मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, हारिस रऊफ, अबरार अहमद, हुसैन तलत, फहीम अशरफ, हसन अली, मोहम्मद वसीम जूनियर, सलमान मिर्जा, सुफियान मुकीम.












Click it and Unblock the Notifications