Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी : भारत आणि न्युझीलंड मालिकेचे बीसीसीआयने केले वेळापत्रक जाहीर! जाणून घ्या कधी होणार मॅच

India Vs New Zealand Series 2026 BCCI Announced Scheduled : भारत-न्यूझीलंड यांच्यात दोन वर्षांनंतर आता क्रिकेटची मालिका होत असून भारतात पुढील वर्षी जानेवारी २०२६ मध्ये सामने रंगणार आहेत. ही मालिका भारत आणि किवी संघासाठीही खास आहे. कारण टी- २० विश्वचषकापूर्वी रंगीत तालिम ठरणार आहे आणि दोन्ही संघांना कसून सराव करत आपले कसब सिद्ध करण्यासाठी ही एक नामी संधी आहे.

India Vs New Zealand Series

कधी आणि कसा आहे न्युझीलंडचा भारत दौरा?

  • न्यूझीलंड संघ या भारत दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामने खेळेल
  • न्युझीलंडचा भारतात दौरा ११ जानेवारीपासून सुरू होईल.
  • ११ जानेवारी रोजी वडोदरा येथे होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याने होईल.
  • १४ जानेवारी रोजी राजकोट येथे दुसरा सामना खेळवला जाईल.
  • १८ जानेवारी रोजी इंदूर येथे तिसरा सामना खेळला जाईल.

टी- २० सामने कधीपासून खेळले जाणार

न्यूझीलंड संघ या भारत दौऱ्यावर पाच टी-२० सामने खेळेल.
२१ जानेवारी रोजी नागपूर येथे टी-२० सामने सुरू होतील.
२३ जानेवारी रोजी रायपूर येथे टी -२० सामना खेळवला जाईल.
२५ जानेवारी रोजी गुवाहाटी येथे सामना खेळवला जाईल.
२८ जानेवारी रोजी विशाखापट्टणम् येथे सामना खेळला जाईल.
३१ जानेवारी रोजी त्रिवेंद्रम येथे शेवटचा टी-२० सामना खेळला जाईल.

यापुर्वीची मालिका भारताने जिंकली होती

२०२४ च्या टी-२० विश्वचषकाचा विजेता म्हणून भारत या मालिकेत प्रवेश करणार असताना भारताने गेल्या वेळी मालिका जिंकली होती. संघ आपला विजयी सिलसिला कायम ठेवण्याचा आणि आगामी स्पर्धेसाठी जोरदार तयारी करण्याचा प्रयत्न करेल. न्यूझीलंड संघाने शेवटचा २०२३ च्या सुरुवातीला भारताचा दौरा केला होता, पण त्यांना पराभव पाहावा लागला.

मागील दौऱ्यात न्युझीलंडची कामगिरी कशी होती?

२०२३ मध्ये जेव्हा न्युझीलंड संघ भारतात खेळायला आला, त्यावेळी पहिला सामना रांची येथे खेळवला गेला, या दौऱ्यात न्युझीलंड संघाने फक्त एकच टी-२० विजय मिळवला तर इतर सर्व सामन्यांमध्ये भारताने त्यांना पराभूत केले.

ही मालिका का असेल खास

न्युझीलंड आणि भारतीय संघ या मालिकेत तीन एकदिवसीय सामने आणि पाच टी-२० सामने खेळणार आहे. ही मालिका क्रिकेट चाहत्यांसाठी खूप रोमांचक असणार आहे, कारण सूर्यकुमार यादव आणि मिशेल सॅटनरसारखे तरुण तडफदार कर्णधार आपपाल्या संघाची धुरा सांभाळत आहेत. विश्वचषकापूर्वी ही एक उत्तम सराव संधी असेल. १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, पहिला पुरुष आंतरराष्ट्रीय सामना वडोदरा येथे खेळला जाईल. यापूर्वी, शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंड आणि भारत यांच्यात डिसेंबर २०१० मध्ये वडोदरा येथील रिलायन्स स्टेडियमवर खेळला गेला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+