Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

India Vs New Zealand : भारत पहिल्या डावात 156 धावांवर ऑलआऊट; न्यूझीलंडची 301 धावांची आघाडी

India Vs New Zealand 2nd Test : भारत विरुद्ध न्यूझीलंडसोबतच्या दुसऱ्या कसोटी सामना पुणे येथे पार पडला. कसोटीत न्यूझीलंडचा संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाने 5 गडी गमावून 198 धावा केल्या होत्या.

आता त्यांची एकूण आघाडी 301 धावांची झालेली आहे. तर भारतीय संघाचा डाव गडगडला आहे. भारतीय संघाचा पहिला डाव 156 धावांवर आटोपला. न्यूझीलंडने पहिल्या डावात 259 धावा केल्या होत्या.

India Vs New Zealand Second Test

दुसऱ्या डावात न्यूझीलंडकडून टॉम लॅथम 86, विल यंग 23, डॅरिल मिशेल 18, डेव्हॉन कॉनवे 17 आणि रचिन रवींद्र 9 धावा करून बाद झाले. भारताकडून आतापर्यंत वॉशिंग्टन सुंदरने 4 बळी घेतले आहेत. रविचंद्रन अश्विनला 1 बळी मिळाला. सुंदरने पहिल्या डावात 7 विकेट्सही घेतल्या होत्या.

टीम इंडियाने शेवटच्या 9 विकेट्स 140 रन्समध्ये गमावल्या - भारतीय टीम पहिल्या इनिंगमध्ये 156 रन्सवर ऑलआऊट झाली होती. शुक्रवारी टीम इंडियाने 16/1 च्या स्कोअरसह खेळण्यास सुरुवात केली आणि 140 धावा करताना शेवटचे 9 विकेट गमावले.

रवींद्र जडेजाने भारतीय डावात सर्वाधिक 38 धावा केल्या. यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी 30-30 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने 7 विकेट घेतल्या. ग्लेन फिलिप्सला 2 बळी मिळाले. टीम साऊदीच्या खात्यात एक विकेट आली. गुरुवारी नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडने पहिल्या डावात 259 धावा केल्या. टीम इंडिया मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे.

कॉनवे आणि रचिन यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र त्यानंतर वॉशिग्टन सुंदरने न्यूझीलंडच्या डावाला सुरुंग लावला. 3 बाद 197 अशा सुस्थितीत न्युझीलंड दिसत असताना वॉशिंग्टन सुंदरच्या माऱ्यासमोर न्यूझीलंडचा डाव अवघ्या 259 धावांमध्ये आटोपला.

न्यूझीलंडने अवघ्या 62 धावांत 7 फलंदाज गमावले. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या दिवशी मोठे यश मिळालं. टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदरने अवघ्या 59 धावांमध्ये सात बळी टिपले, तर अश्विनने सुंदर साथ देताना 64 धावांमध्ये तीन बळी टिपले. न्यूझीलंडचे चार फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले.

न्यूझीलंडचा पहिला डाव कसा राहिला?

पुणे कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडने 259 धावा केल्या. पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला किवी संघ 259 धावांत सर्वबाद झाला. न्यूझीलंडकडून सलामीवीर ड्वेन कॉनवेने सर्वाधिक 76 धावा केल्या. याशिवाय बंगळुरू कसोटीचा हिरो रचिन रवींद्रने 65 धावांचे योगदान दिले. भारतासाठी वॉशिंग्टन सुंदर हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. वॉशिंग्टन सुंदरने 7 विकेट्स घेतल्या.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप.

न्यूझीलंड: टॉम लॅथम (कर्णधार), ड्वेन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, टिम साऊदी, मिचेल सँटनर, एजाज पटेल, विल्यम ओ'रुर्के.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+