Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

India vs New Zealand : न्यूझीलंडविरुद्धच्या 3 कसोटी सामने कधी? जाणून घ्या वेळ आणि कुठे बघाल मोफत मॅच

India vs New Zealand : क्रिकेटचा फिवर जोरात असून बांगलादेशविरुद्ध दमदार कामगिरी करणारा भारतीय संघ आता चांगलाच फार्मात असून आगामी न्युझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निव़ड करण्यात आली आहे. भारत विरुद्ध न्युझीलंड न्यूझीलंडविरुद्धच्या 3 कसोटी सामने कधी आहेत, कधी, कुठे सामने हे पाहता येतील हे आपण जाणून घेऊया.

पहिला सामना 16 ऑक्टोबरपासून

या मालिकेचा पहिला सामना 16 ऑक्टोबरपासून बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान पुणे इथे होणार आहे तर तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

India vs New Zealand Know when and where to watch the three Test matches

तीन कसोटी जसप्रित बुमराह उपकर्णधार

बीसीसीआयनं न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा केलीयं. बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ निवडला आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची या मालिकेसाठी उपकर्णधार म्हणून निवड केलीयं. त्यामुळं आता त्याच्यावर गोलंदाजीसह भारतीय संघाला विजय मिळवून देण्याची मोठी जबाबदारीही आहे.

असा आहे भारतीय संघ, दोन विकेटकिपरचा संघात समावेश

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघात रोहित शर्मा कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे तर जसप्रीत बुमराह उपकर्णधार असेल. या संघात स्टार फलंदाज यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान यांचा समावेश आहे तर ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल या दोन विकेटकीपर्सना संघात स्थान दिलं गेलं. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप या गोलंदाजांनाही भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.

कधी आणि कुठे पाहू शकता सामने

भारत - न्युझीलंड यांच्यातील कसोटी सामने तुम्ही मोफत पाहू शकता. सर्व कसोटी सामन्यांची नाणेफेक सकाळी 9 वाजता होईल आणि सामने 9.30 वाजता सुरू हेणार आहे. हे सामने जियो सिनेमा अॅपवर पाहू शकता. जियो युजर्स हे सामने मोफत पाहू शकणार आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+