Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs NZ Final: चॅम्पियन्स ट्रॉफी कोण जिंकेल? राजस्थानच्या फलोदी सट्टा बाजाराचं धक्कादायक भाकित

IND vs NZ Final: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 9 मार्च (रविवार) भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्याबाबत राजस्थानच्या फलोदी सट्टा बाजारचा अंदाजही समोर आला आहे. फलोदी बुकींनी भाकित केले आहे की, यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी कोण जिंकेल?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 25 वर्षांनंतर भारत आणि न्यूझीलंड संघ पुन्हा एकदा आमनेसामने येत आहेत. त्यावेळी न्यूझीलंड जिंकला होता. आता 2025 मध्ये भारतासोबत न्यूझीलंडनेही शानदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. निवडणूक निकालांच्या अचूक भाकितांसाठी प्रसिद्ध फलोदी सट्टा बाजाराच्या मॅचविनर भाकितांवरही सर्वांचे लक्ष लागले आहे.

india vs new zealand Final Match

फलोदी सट्टेबाजारात भारत-न्यूझीलंडचे दर

राजस्थानमधील जोधपूरजवळील फलोदी सट्टेबाजी बाजाराशी जोडलेल्या एका वेबसाइटवर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतासाठी भाव 1.42 रुपये ते 1.47 पैसे आहे तर न्यूझीलंडच्या संघसाठी 3.15 रुपये ते 3.40 रुपये भाव आहे.

भारत आणि न्यूझीलंडमधील विजेता कोण असेल?

बुकींच्या भाषेत सांगायचे तर ज्या संघाची शक्यता कमी असते त्यांना सामना जिंकण्याची शक्यता जास्त असते. फालोदी सट्टा मार्केटच्या किमती पाहता अंतिम सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर विजय निश्चित असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हे भाकिते असूनही हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की क्रिकेटच्या मैदानात काही ही होऊ शकते. दोन्ही संघाची उत्कृष्ट कामगिरी या स्पर्धेत राहिली आहे.

गुगलवर जिंकण्याची शक्यता कोणाला आहे?

फलोदी सारख्या सट्टेबाजी बाजार आणि क्रिकेट प्रेमीच नाही तर सर्च इंजिन गुगल देखील क्रिकेट सामन्यांमध्ये संघांच्या विजय किंवा पराभवाच्या शक्यतांची टक्केवारी दाखवते, जी संघातील खेळाडू, त्यांची कामगिरी आणि लाईव्ह अपडेट्सवर आधारित असते. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधी गुगलवर भारताची जिंकण्याची शक्यता 69 टक्के आणि न्यूझीलंडची जिंकण्याची शक्यता 31 टक्के दाखवली जात आहे.

टीप: जुगार खेळणे बेकायदेशीर आहे. वनइंडिया मराठी टीम फलोदी सट्टा बाजारच्या भाकितांना पुष्टी किंवा समर्थन देत नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+