Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs NZ: अंतिम सामन्यात भारतासाठी धोका बनू शकतात हे 3 किवी खेळाडू, तिघांनीही केला आहे कहर

IND vs NZ Final: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात खेळला जाईल. हा सामना 9 मार्च रोजी दुबई क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे आणि या अंतिम सामन्याने या स्पर्धेचा समारोप होईल. भारतीय संघाचा सामना लीग टप्प्यात किवी संघाशीही झाला आहे.

लीग टप्प्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत केले होते. आता खरा सामना अंतिम सामन्यात होणार आहे. किवी संघाने उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला मोठ्या धावसंख्येने पराभूत केलं आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्की वाढला असणार आहे. किवी संघाचे प्रमुख खेळाडू चांगलेच फॉर्मात परतले आहेत. मागील सामन्यात रचिन रविंद्र आणि केन विल्यमसन शतकी खेळी करुन संघाचा सहज विजय मिळवून दिला होता.

India vs New Zealand

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना यापूर्वी एकदा झाला आहे. 2000 मध्ये या दोन संघांमधील अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघाला आता या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. पण हे तीन किवी खेळाडू भारतासाठी घातक ठरू शकतात.

रचिन रवींद्र

या यादीतील पहिली खेळाडू म्हणजे रचिन रवींद्र आहे. गट फेरीत तो भारताविरुद्ध अपयशी ठरला पण त्याची बॅट चांगल्या धाव निघत आहेत. रवींद्रने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण दोन शतके ठोकली आहेत. त्याचे शतक आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात झाले. तो भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो.

केन विल्यमसन

दुसरे नाव फलंदाजी विभागातील आणखी एक खास नाव आहे आणि ते म्हणजे केन विल्यमसन. दुबईमध्ये झालेल्या भारताविरुद्धच्या सामन्यात तो क्रीजवर चांगला खेळला पण त्याला विजय मिळवून देता आला नाही. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात विल्यमसनची बॅट पूर्ण जोमात होती आणि शतकी खेळी पाहायला मिळाली. टीम इंडियाला त्याच्यापासून सावध राहावे लागेल.

मिचेल सँटनर

किवी कर्णधार मिचेल सँटनरने त्याच्या गोलंदाजीने चमकदार कामगिरी करून फलंदाजांना कठीण वेळ दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात मिचेल सँटनरने तीन विकेट्स घेतल्या. त्याने स्पर्धेत आतापर्यंत एकूण 7 विकेट्स घेतल्या आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+