Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

स्मृती मंधानाने वनडेमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम रचला; षटकारांचा पाऊस अन् कोहली क्लबमध्ये एंट्री

Smriti Mandhana : आयर्लंडविरुद्धच्या राजकोट एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला फलंदाजांनी कहर केला. टीम इंडियाच्या महिलांनी धुरळाच उडवला. स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांनी मिळून अद्भुत फलंदाजी दाखवली आणि गोलंदाजांची वाट लावली.

मंधानाने स्फोटक फलंदाजी करून एक विक्रम रचला. तिने महिला एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम केला. पुरुष क्रिकेटमध्ये हा विक्रम स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावावर आहे.

स्मृती मंधनाने इतिहास रचला

मंधानाने फक्त 70 चेंडूत शतकी खेळी केली. तिने प्रतीकासोबत 200 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. 80 चेंडूंचा सामना करताना स्मृती मानधनाने 12 चौकार आणि 7 षटकार मारले आणि 135 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतली.

Smriti Mandhana

स्मृती मंधानाचा अनोख्या यादीत समावेश

या शतकासह, मानधनाने महिला क्रिकेटमधील 10 किंवा त्याहून अधिक एकदिवसीय शतके झळकावणाऱ्या निवडक फलंदाजांमध्ये आपले नाव नोंदवले आहे. मानधनाच्या व्यतिरिक्त, मेग लॅनिंगने 15 शतके आणि सुझी बेट्सने 13 शतके झळकावली आहेत. टॅमी ब्यूमोंटनेही 10 शतके केली आहेत.

भारतीय संघाने ४०० चा आकडा गाठला

भारतीय संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा स्वतःचाच विक्रम मोडला. गेल्या सामन्यातच भारताने ३७० धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडत, टीम इंडियाने प्रथमच एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४०० धावांचा टप्पा गाठून इतिहास रचला.

भारतीय संघाने 5 विकेटच्या मोबदल्यात 435 धावांचा मोठा डोंगर उभा केला. प्रतीका आणि मंधानाच्या शतकांव्यतिरिक्त, रिचा घोषनेही अर्धशतक झळकावले. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्या न्यूझीलंडने आयर्लंडविरुद्ध केली आहे. किवी संघाचा 4 विकेटसाठी 491 धावांचा विक्रम आहे. भारतीय संघ यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+