IND vs ENG ODI: एकदिवसीय सामना तुम्ही कधी, कुठे आणि पाहू शकता? संपूर्ण वेळापत्रक येथे पहा
India vs England, 1st ODI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर बहुप्रतिक्षित एकदिवसीय मालिका नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू होणार आहे. या मालिकेत एकूण तीन एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. त्यातील पहिला सामना 6 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे.
एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना 9 फेब्रुवारी रोजी कटकमध्ये खेळला जाईल, तर तिसरा सामना 12 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये खेळला जाईल. या सामन्यांमध्ये दोन्ही संघांकडून सर्वोत्तम उत्सुक असणार आहेत.

रोहित आणि विराट मैदानात परतणार
भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आहे. या मालिकेसाठी विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांचा संघात समावेश आहे. इंग्लंडच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व जोस बटलर करत आहेत. इंग्लंडच्या संघात फिल साल्ट आणि आदिल रशीद यांचा समावेश आहे.
IND vs ENG ODI: चाहते एकदिवसीय मालिकेबद्दल उत्सुक
दोन्ही संघ आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयारी करत असताना ही मालिका अटीतटीची होणार आहे. चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
IND Vs ENG ODI: सामना कधी आणि कुठे लाईव्ह पाहू शकता?
भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरू होतील. तर नाणेफेक तीस मिनिटे आधी दुपारी 1:00 वाजता होईल. एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. हा सामना डिस्ने+ हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी देखील उपलब्ध असेल.
भारत संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह , मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा
इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, फिल साल्ट, जेकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, आदिल रशीद, साकिब महमूद आणि मार्क वूड.












Click it and Unblock the Notifications