Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

India vs England : भारताने इंग्लडविरुद्ध सिरीज जिंकली; चौथ्या T-20I सामन्यात 15 धावांनी विजय

India vs England 4th T20 : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या 5 , T20 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना आज (31 जानेवारी) रोजी झाला. पुणे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडचा 15 धावांनी पराभव केला. यासह, संघाने 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी अजिंक्य आघाडी घेत मालिका विजय मिळवला.

नानेफेक जिकंल्यानंतर इंग्लंडने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 9 विकेट गमावत 181 धावा केल्या. इंग्लड संघ 166 धावा करून सर्वबाद झाला. भारताकडून शिवम दुबेच्या (कन्कशन सब्स्टिट्यूट) खेळाडू हर्षित राणाने 3 विकेट्स घेतल्या. रवी बिश्नोईनेही 3 विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्तीने 2 विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. फलंदाजीत हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 53-53 धावा केल्या.

तत्पुर्वी प्रथम फलंदाजी करत भारताने चौथ्या टी-20 सामन्यात इंग्लंडला 182 धावांचे आव्हान दिले होते. दरम्यान, भारताने 12 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. येथून हार्दिक पंड्या आणि शिवम् दुबे यांनी अर्धशतके झळकावली. यामुळे संघाने 9 विकेट गमावून 181 धावापर्यंत पोहचू शकला.

इंग्लंडकडून साकिब महमूदने 3 आणि जेमी ओव्हरटनने 2 विकेट घेतल्या. आदिल रशीद आणि ब्रायडन कार्स यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. 3 फलंदाज धावबाद झाले.

टीम इंडियाला झटका!

टीम इंडियाचे धुरंधर सलामीवर फलंदाजीला उतरल्यानंतर संघाला मोठा धक्का बसला. टीम इंडियाने 5 षटकांनंतर 3 गडी गमावून 37 धावा केल्या आहेत. साकिब महमूदने षटकात 3 बळी घेतले. सलग चौथ्या सामन्यात संजू सॅमसन शॉर्ट बॉलवर आऊट झाला, तो स्क्वेअर लेगवर साकिब महमूदने झेलबाद झाला. सॅमसनला केवळ 1 धाव करता आली. टिळक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना खातेही उघडता आले नाही. सध्या भारताकडून अभिषेक शर्मा आणि रिंकू सिंग खेळपट्टीवर आहेत.

India vs England 4th T20

मोहम्मद शमीला प्लेईंग - 11 मधून वगळले!

विशेष बाब म्हणजे भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीसह काही खेळाडू प्लेइंग 11 मधून बाहेर आहेत. ते आजच्या सामन्यात खेळणार नाहीत. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये तीन बदल करण्यात आले आहेत. अष्टपैलू शिवम दुबे, डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि फलंदाज रिंकू सिंग यांना या सामन्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. अशा परिस्थितीत वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी आणि ध्रुव जुरेल या सामन्यातून बाहेर ठेवले आहे.

इंग्लंड संघातही दोन बदल पाहायला मिळाले. या सामन्यात अष्टपैलू जेकब बेथेल आणि वेगवान गोलंदाज साकिब महमूद खेळले. त्याने अनुक्रमे जेमी स्मिथ आणि मार्क वुडची जागा घेतली.

भारतीय संघ : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, ध्रुव जुरेल, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, रिंकू सिंग, शिवम दुबे, रमणदीप सिंग, हर्षित राणा.

इंग्लंड संघ : फिलिप सॉल्ट, बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), जेमी ओव्हरटन, ब्रायडन कारसे, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड, साकिब महमूद, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल , रेहान अहमद.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+