IND vs ENG : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली हिट ठरेल की फ्लॉप? अहमदाबादमध्ये असा आहे रेकॉर्ड
IND vs ENG 3rd ODI Virat Kohli: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज बुधवार 12 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. भारतीय संघाने मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतल्यानंतर भारतीय टीम विजयी सिलसिला सुरू ठेवण्याचा प्रयत्न करेल. हा सामना जिंकून भारतीय संघ इंग्लंडला व्हाईटवॉश करू इच्छितो.
विराट कोहलीच्या फॉर्मवर लक्ष
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावून आपला फॉर्म परत मिळवला आहे. आता सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर आहेत. चाहत्यांना आशा आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी विराट कोहली देखील बॅटने आपली ताकद दाखवेल. विराट कोहली बऱ्याच काळापासून फॉर्ममध्ये नाही. दिल्लीसाठी रणजी ट्रॉफीमध्ये विराट कोहलीलाही त्याचा फॉर्म मिळाला नाही.

इंग्लंडविरुद्ध कोहलीची कामगिरी
इंग्लंडविरुद्ध विराट कोहलीची फलंदाजीची सरासरी 40.75 आहे. आतापर्यंत विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध 37 सामने खेळले आहेत आणि या काळात त्याच्या बॅटने 1345 धावा केल्या आहेत. येत्या सामन्यांमध्ये विराट कोहली त्याची सरासरी सुधारण्याचा प्रयत्न करेल.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोहलीचा रेकॉर्ड
2010 मध्ये विराट कोहलीने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना खेळला. तर शेवटचा 2023 मध्ये येथे खेळताना दिसला होता. आतापर्यंत विराट कोहलीने या मैदानावर एकूण 9 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात त्याला फक्त 246 धावा करता आल्या. कोहलीने शेवटचे शतक 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात केले होते.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 9 एकदिवसीय सामन्यांच्या 9 डावांमध्ये विराट कोहलीने 27.33 च्या अत्यंत खराब सरासरीने फक्त 246 धावा केल्या आहेत. त्याने येथे 2 अर्धशतके झळकावली आहेत तर त्याची सर्वोत्तम धावसंख्या 57 धावा आहे. विराट कोहलीने आतापर्यंत या मैदानावर एकही शतक झळकावलेले नाही. अशा परिस्थितीत चाहत्यांना आशा असेल की इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात विराट कोहली मोठी खेळी खेळेल.












Click it and Unblock the Notifications