भारत-इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग-11 मध्ये शमीला संधी ? अभिषेक बद्दलही आलं अपडेट
IND vs ENG 2nd T20I Predicted XI: टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात आज 25 जानेवारी रोजी चेन्नईतील प्रतिष्ठित चेपॉक स्टेडियमवर दुसऱ्या टी-20 सामन्यात आमनेसामने येणार आहेत. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सामन्यासाठी फिट आहे का ? अभिषेक शर्मा त्याच्या दुखापतीतून बरा होईल का याची चाहते वाट पाहत असल्याने सर्वांच्या नजरा भारतीय संघावर असणार आहेत.
टीम इंडियाने अर्शदीप सिंगच्या रूपाने फक्त एका आघाडीच्या वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरली आहे. तसेच मोहम्मद शमीला आणखी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही अर्शदीपने सांगितले की तो वेगवान गोलंदाज मालिकेत खेळण्यास उत्सुक आहे.

फाईल फोटो सौजन्य- पीटीआय
टीम इंडियाच्या मैदानावरील कामगिरी पाहता संघ निवड योग्य ठरली आहे. कारण अभिषेक शर्माने फिनिशिंग टच देण्यापूर्वी वरुण चक्रवर्ती आणि फिरकीपटूंनी ईडन गार्डन्सवर इंग्लंडला पराभूत केलं आहे.
14 महिन्यांनंतर शमी संघात संधी ?
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात आज 25 जानेवारी रोजी चेन्नईतील प्रतिष्ठित चेपॉक स्टेडियमवर दुसऱ्या टी-20 खेळला जाणार आहे. तेव्हा क्रिकेटप्रेमींचे लक्ष पुन्हा एकदा टीम मॅनेजमेंटकडे लागलं आहे. 14 महिन्यानंतर शमीला संघात संधी मिळते का याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
वरुण चक्रवर्तीला संघात पुन्हा संघात संधी मिळणार ?
भारताच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनबाबत मुख्य चर्चेचा मुद्दा म्हणजे शमीची तंदुरुस्ती आहे. शम्मीने नेटमध्ये सराव करताना घाम गाळला आहे, परंतु शमीच्या दोन्ही पायांवर जड पट्ट्या होत्या, यावरुन असं वाटते की, वेगवान गोलंदाजाला त्याचा लय सापडत नव्हता. भारत या सामन्यासाठी उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती यांना संघात कायम ठेवण्याची अपेक्षा आहे.
अभिषेक शर्माच्या पुनरागमनाबद्दल काय अपडेट
जर शमी संघात परतला तर तो नितीश कुमार रेड्डीच्या जागेवर संघात येऊ शकतो. तसेच अभिषेक शर्माच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला उपचार घ्यावे लागले आहेत. अभिषेक शर्माच्या रुपाने टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. त्याच्या पुनरागमनाबद्दल अद्याप पूर्णपणे पुष्टी झालेली नाही.
पहिल्या टी-20 मध्ये उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या या सलामीवीराला शनिवारी होणाऱ्या सामन्यासाठी वेळेत तंदुरुस्त होण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. जर अभिषेक खेळू शकला नाही तर टीम इंडियाच्या संघात ध्रुव जुरेल किंवा वॉशिंग्टन सुंदर यांना संघात संधी मिळू शकते. आजच्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादव किंवा तिलक वर्मा हे सलामीला येण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications