Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारत - इंग्लंड यांच्यातील दुसरा T20 सामना कधी आणि कुठे खेळला जाईल, संपूर्ण वेळापत्रक येथे पहा

India vs England, T20I: अभिषेक शर्माच्या स्फोटक खेळीमुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला आहे. 133 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने सामन्यावर सहज वर्चस्व गाजवत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील दुसरा टी-20 सामना कधी आणि कुठे खेळला जाईल ते जाणून घेऊया.

इंग्लंड भारताविरुद्धच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी उत्सुक असेल. दुस-या या सामन्याची चाहते ही आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन्ही संघ त्यांचे सर्वोत्तम खेळाडू मैदानात उतरवतील त्यामुळे ही मालिका एक रोमांचक सामना होण्याची अपेक्षा आहे.

India and England

फोटो सौजन्य- पीटीआय

भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?

मालिकेतील दुसरा सामना 25 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार चेन्नई येथे संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. ही मालिका भारतात डिस्ने+ हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल. यूके अमेरिकेतील प्रेक्षक टीएनटी स्पोर्ट्स आणि डिस्कव्हरी+ वर ही मालिका पाहू शकतात.

पहिल्या सामन्यात अभिषेक शर्माची शानदार खेळी

भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या सामन्यात अभिषेक शर्माने 34 चेंडूत 79 धावा केल्या तर संजू सॅमसनने 20 चेंडूत 26 धावा केल्या. भारताने केवळ 12.5 षटकांत लक्ष्य गाठलं. त्याच्याशिवाय तिलक वर्मानेही 16 चेंडूत 19* धावा केल्या. या सामन्यात वरुण चक्रवर्तीने 3 तर अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. इंग्लंडकडून जोस बटलरने 44 चेंडूत 68 धावा केल्या.

भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 मालिका 2025 संघ

भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या आणि ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).

इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वूड, रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस अ‍ॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन आणि आदिल रशीद.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+