Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs BAN U19 Women : भारताच्या महिला संघाने आशिया कप जिंकला, बांगलादेशचा केला दारुण पराभव

भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत 2024 च्या अंडर-19 महिला आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. रविवारी (22 डिसेंबर) क्वालालंपूरच्या ब्युमास ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा 41 धावांनी पराभव केला.

अंतिम सामन्यात बांगलादेशी संघासमोर विजयासाठी 118 धावांचे लक्ष्य होते, परंतु बांगलादेशचा संघ अवघ्या 76 धावांत गडगडला. ही स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात आली आहे. अशा स्थितीत भारतीय संघाने जेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली.

त्रिशाच्या बॅटने धूमाकूळ घातला

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 7 गडी गमावून 117 धावा केल्या. भारताकडून सलामीवीर गोंगडी त्रिशाने 47 चेंडूत सर्वाधिक 52 धावा केल्या. मिथिला विनोद (17 धावा), कर्णधार निक्की प्रसाद (12 धावा) आणि आयुषी शुक्ला (10 धावा) यांनाही दुहेरी अंक गाठण्यात यश आले. बांगलादेशकडून फरझाना इस्मीनने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर निशिता अक्टर आणि निशी यांना दोन आणि हबीबा इस्लामला एक विकेट घेता आली.

IND vs BAN U19 Women s Asia Cup Final 2024

फोटो क्रेडिट- BCCI Women

बांगलादेशचा संघ 76 धावांमध्ये गारद

प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 18.3 षटकांत अवघ्या 76 धावांत गारद झाला. यष्टिरक्षक झुरिया फिरदौसने 30 चेंडूत 3 चौकारांसह सर्वाधिक 22 धावा केल्या. तर सलामीवीर फाहोमिदा चोयाने 18 धावा केल्या. या दोघींशिवाय बांगलादेशच्या इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

भारतीय संघाकडून डावखुरी फिरकीपटू आयुषी शुक्लाने सर्वाधिक तीन बळी घेतले. फिरकी गोलंदाज सोनम यादव आणि पारुनिका सिसोदिया यांनाही प्रत्येकी दोन यश मिळाले. व्हीजे जोशीथालाही एक विकेट घेता आली.

भारतीय संघाचे प्लेइंग-11

गोंगडी त्रिशा, कमलिनी (यष्टीरक्षक), सानिका चाळके, निक्की प्रसाद (कर्णधार), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, आयुषी शुक्ला, व्हीजे जोशिथा, शबनम शकील, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया.

बांगलादेशचा प्लेइंग-11

फाहोमिदा चोया, मोसममत इवा, सुमैया अख्तर, झुरिया फिरदौस (यष्टीरक्षक), सुमैया अक्टर (कर्णधार), सादिया अख्तर जन्नतुल मौआ, हबीबा इस्लाम, फरजाना इस्मीन, निशिता अक्टर निशी, अनिसा अक्तर सोबा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+