Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आता रंगणार बांग्लादेशविरुद्ध टी-20 चा थरार; कुणाला संधी, वेळ, ठिकाण अन् सामने कुठे बघाल?

India vs Bangladesh 1st T20 Match : बांगलादेश विरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका भारताने 2-0 अशा फरकाने खिशात घातली. चेन्नईतील पहिल्या कसोटीत टीम इंडियाने 280 धावांनी विजय मिळवला. कानपूरमध्ये रंगलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला.

आता कसोटीनंतर दोन्ही संघ टी-20 मालिकेसाठी मैदानात उतरणार आहेत. या दोन्ही देशांत टी-20 चे तीन सामने होणार आहेत. 6 ऑक्टोबरपासून ही मालिका सुरू होईल. त्यातील पहिला सामना ग्वाल्हेरच्या न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर दुसरा सामना 9 ऑक्टोबरला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर तर तिसरा आणि शेवटचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार तिन्ही टी-20 सामने संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील.

India vs Bangladesh T20

सामना कुठे बघाल?

भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. त्यात टीम इंडियाने 13 सामने जिंकले आहेत. फक्त एक सामना बांगलादेशला जिंकता आला. भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेचे स्पोर्ट्स 18 च्या माध्यमातून टीव्हीवर थेट प्रक्षेपण केले जाईल. मोबाईलवर या मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioCinema वर 'फ्री' बघू शकता.

कसं आहे टी-20 मालिकेचं वेळापत्रक?

पहिला सामना 6 ऑक्टोबरला न्यू माधवराव सिंधिया स्टेडियम, ग्वाल्हेर येथे होईल. तो सायंकाळी सात वाजता सुरु होईल. दुसरा सामना 9 ऑक्टोबरला अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे खेळला जाईल. तर तिसरा आणि शेवटचा सामना 12 ऑक्टोबरला राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद येथे होईल. हे सगळे सामने सायंकाळी सात वाजता सुरु होतील.

असा आहे भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव.

असा आहे बांगलादेश संघ
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झीद हसन तमीम, परवेझ हुसेन इमॉन, तौहीद ह्रदॉय, महमुदुल्ला, लिटन दास, झाकीर अली, मेहदी हसन मिराज, मेहदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, तन्झीम हसन साकीब, तनजीद हसन साकीब हसन.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+