India VS Bangladesh, 2nd Test : भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला
India VS Bangladesh, 2nd Test :भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीसाठी नाणेफेक कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर ओल्या मैदानामुळे उशीर झाला आहे. कानपूरमध्ये सध्या पाऊस थांबला. मैदानावरील कव्हर काढले गेले. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघाचे प्लेइंग 11
भारत : (प्लेइंग इलेव्हन):
यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
बांगलादेश : (प्लेइंग इलेव्हन):
शादमान इस्लाम, झाकीर हसन, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद.
अश्विनच्या कामगिरीने पहिली कसोटी जिंकली
रविचंद्रन अश्विनच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताने चेन्नईतील पहिली कसोटी 280 धावांनी जिंकली. या स्टार खेळाडूने खेळातील आपल्या एकमेव डावात 113 धावा केल्या आणि 88 धावांत 6 बळी घेतले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या आशा मजबूत ठेवण्यासाठी बांगलादेशला पराभूत करण्याचे भारताचे लक्ष्य असेल.
दोन्ही संघातील संपूर्ण प्लेअरची नावं
भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, अक्षर पटेल, सरफराज खान , यश दयाल, ध्रुव जुरेल.
बांगलादेश संघ : शादमान इस्लाम, झाकीर हसन, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, हसन महमूद, तस्किन अहमद, नाहिद राणा, तैजुल इस्लाम, जाखर अली , नईम हसन, खालिद अहमद, महमुदुल हसन जॉय.












Click it and Unblock the Notifications