Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs BAN : भारत विरुध्द बांग्लादेश टी 20I दुसरा सामना कधी आणि कुठे पाहायचा ? घ्या जाणून सर्व काही

IND vs BAN T20I Mach : टीम इंडिया (IND) बांगलादेश (BAN) विरुद्धच्या दुसऱ्या T20I सामन्यात आघाडी घेण्यासाठी कोणतीही सोडणार नाही. सूर्यकुमार यादवची यंग बिग्रेड टीम आज बुधवार 9 ऑक्टोबर रोजी अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर मैदानात उतरणार आहे. संध्याकाळी . 6 30 वाजता नाणेफेक होईल होऊन सामन्याला 7 वाजता सुरुवात होणार आहे. दुसरीकडे बांगलादेश संघ पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. सामन्यापूर्वी हेड-टू-हेड रेकॉर्डवर एक नजर टाकूया.

सध्या सुरू असलेल्या मालिकेत बांगला टायगर्सवर टीम इंडियाचे वर्चस्व स्पष्ट आहे. टीम इंडियातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊनही पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे पाहुणा संघ भारताविरुद्ध संघर्ष करत असल्याचे दिसत आहे. मालिकेत जिवंत राहण्यासाठी नझमुल हुसेन शांतो आणि त्याचा संघाला पूर्णपणे ताकदीने उतरेल.

Team India

टीम इंडियाने पहिल्या सामन्यातच वर्चस्व दाखवलं आहे. पहिल्या T20I मध्ये बांगलादेशवर आरामात विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमार यादव यंग ब्रिग्रेड दुसऱ्या सामन्यात बांगलादेशवर वर्चस्व राखण्यासाठी मैदानात पूर्णपणे ताकदीने उतरणार आहे. पुढचा सामना जिंकून मालिका जिंकण्याचे टीम इंडियाचे लक्ष्य असेल, तर बांगला टायगर्सला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी विजय आवश्यक आहे.

बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया मजबूत स्थितीत

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्डवर टीम इंडियाचे वर्चस्व आहे. तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यातील विजय हा भारताचा बांगलादेशवर सर्वात लहान फॉर्मटमधील 14 वा विजय आहे. बांगलादेशने भारताविरुद्ध 15 पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे.

भारत-बांगलादेशचा दुसरा सामना कोण जिंकणार?

भारताने बांगलादेशविरुद्धचा पहिला सामना ज्या प्रकारे जिंकला त्यावरून हे स्पष्ट होते की प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत त्यांच्याकडे वर्चस्व गाजवण्याची क्षमता आहे. त्याबरोबरच हेड टू हेड रेकॉर्ड टीम इंडियाच्या बाजूने आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया मालिकेतील दुसरा सामनाही जिंकण्याची शक्यता आहे.

सामना पाहणार कुठे पाहणार ?

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश दुसरा टी 20I सामना हा स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल तर तुम्हाला जर मोबाईलवर हा सामना पाहायचा असेल तर जिओ सिनेमा या अॅपवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, तिलक वर्मा, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव, जितेश शर्मा,रवी बिश्नोई आणि हर्षित राणा.

टीम बांगलादेश : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास (विकेटकीपर), परवेझ हुसेन इमॉन, तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मुस्तफिजुर रहमान, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मेहिदी हसन मिराज, शॉरीफुल इस्लाम, महेदी हसन, तनजीद हसन, रकीबुल हसन आणि तंजीम हसन साकिब.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+