जसप्रीत बुमराहने घेतला विराट कोहलीचा बदला! धोकादायक फलंदाजाला केलं क्लीन बोल्ड
Ind Vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मेलबर्न कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी जसप्रीत बुमराहला सॅम कॉन्स्टन्सची विकेट घेत मोठं यश मिळवलं आहे. पहिल्या डावात कॉन्स्टसने बुमराह आणि भारतीय गोलंदाजांची धुलाई करत शानदार खेळी खेळली होती. या डावात कॉन्स्टन्सने आपल्या फलंदाजीने भारतीय संघासमोर अडचणी निर्माण केल्या होत्या. मात्र दुसऱ्या डावात बुमराहने कॉन्स्टन्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं आहे.
दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने कॉन्स्टन्स विकेट घेतल्यानंतर आपला आनंदही व्यक्त केला. जसप्रीत बुमराहने विकेट घेतल्यानंतर सहकाऱ्यांसोबत आनंद साजरा केला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बुमराहच्या या सेलिब्रेशनवरून कॉन्स्टन्सची ही विकेट भारतासाठी किती महत्त्वाची होती हे दिसून येते.

जसप्रीत बुमराहचा ऑस्ट्रेलिया संघाला पहिला दणका
जसप्रीत बुमराहने डावाच्या सहाव्या षटकात कॉन्स्टसला बाद केले. त्याने ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर कॉन्स्टासला गोंधळात टाकले, त्यानंतर दुसरा चेंडू बाहेर टाकला. तिसरा चेंडू इन-स्विंग होता, जो स्टंपवर आदळला आणि कोन्टासच्या हातून निसटला. विकेट घेतल्यानंतर बुमराहने ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांकडे पाहून आनंद साजरा केला. दुसऱ्या डावात कांगारू संघाने 20 धावांवर पहिला विकेट गमावला आहे.
बुमराहने घेतला कोहलीचा बदला!
मागील सामन्यादरम्यान सॅम कॉन्स्टेन्स आणि विराट कोहली यांच्यात वाद झाला होता. यानंतर विराट कोहलीवर जोरदार टीका झाली होती. आता जसप्रीत बुमराहने विराट कोहलीचा बदला घेतला आहे, असे म्हणता येईल. एका मुलाखतीत जसप्रीत बुमराहने सांगितले होते की, पहिल्या डावातील पहिल्या दोन षटकांमध्ये तो कॉन्स्टन्सला 6-7 वेळा बाद करण्याच्या जवळ होता.












Click it and Unblock the Notifications