IND vs AUS : 'अरे तू गल्ली क्रिकेट खेळत आहेस का? 'रोहितने चालू सामन्यात युवा खेळाडूची घेतली फिरकी
IND vs AUS 4th Test: मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर चौथ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात ही मालिका सुरु आहे. ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे आणि या कसोटीचा निकाल दोन्ही संघांसाठी ICC जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात महत्त्वाचा आहे.
प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाचा 19 वर्षीय खेळाडू सॅम कॉन्स्टास पदार्पणची चांगली सुरुवात केली. युवा सलामीच्या फलंदाजाने 65 चेंडूत 60 धावा करून प्रेक्षकांची मने जिंकली. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलिया संघाचे सामन्यावर वर्चस्व आहे.

बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावून 311 धावा केल्या आहेत. जसप्रीत बुमराहने भारतासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराहने संघाकडून सर्वाधिक तीन विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या सत्रात भारताने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
या सामन्यात मैदानावर काही रंजक दृश्यही पाहायला मिळाले. या सामन्यात विराट कोहली आणि कॉन्स्टास यांच्यातील वाद ही समोर आला. विराट कोहलीने कॉन्स्टास जोराचा धक्का दिल्याने हा वाद वाढला. दरम्यान यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि युवा खेळाडू यशस्वी जैस्वाल यांच्यात एक क्षण आला ज्याने क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले, जे स्टंप मायक्रोफोनने मध्ये रेकॉर्ड झाले.
मैदानावर क्षेत्ररक्षण करणाऱ्या यशस्वी जैस्वालने फलंदाज चेंडू खेळण्याआधीच उडी मारली. यावर भारतीय कर्णधार रोहीत शर्मा चांगलाच संतापला. रोहित शर्मा म्हणाला, 'अरे जैसू (जैस्वाल), गल्ली क्रिकेट खेळत आहेस का? खाली बसून राहा, जो पर्यंत बॉल खेळेपर्यंत उठू नको.' स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालेला व्हिडीओ आता सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Stump Mic Gold ft. THE BEST, @ImRo45! 🎙️😂
— Star Sports (@StarSportsIndia) December 26, 2024
The Indian skipper never fails to entertain when he’s near the mic! 😁#AUSvINDOnStar 👉 4th Test, Day 1 LIVE NOW pic.twitter.com/1fnc6X054a
चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या सामन्यात जसप्रीत बुमराहने दमदार गोलंदाजी करत तीन विकेट घेतल्या. मेलबर्नमध्ये भारतविरुद्ध कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचे वचर्स्व राहिलं आहे. स्टीव्ह स्मिथ (68*) आणि पॅट कमिन्स (8*) नाबाद असताना ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावून 311 धावा केल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications