Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs AUS: जसप्रीत बुमराहचा कहर, पहिल्या दिवसाचा खेळ संपला, जाणून घ्या कोणाचा पगडा भारी

IND vs AUS, Day 1 Highlights: बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावून 311 धावा केल्या आहेत. जसप्रीत बुमराहने भारतासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराहने संघाकडून सर्वाधिक तीन विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या सत्रात भारताने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. पहिल्या दिवशी खेळपट्टीवर स्टीव्ह स्मिथ आणि कर्णधार पॅट कमिन्स नाबाद आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत सामन्यावर ऑस्ट्रेलियाचा वर्चस्व दिसत आहे.

जसप्रीत बुमराहने ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड केले. ट्रॅव्हिस हेडला या सामन्यात खातेही उघडता आले नाही. या मालिकेत हेडला खाते उघडण्यात अपयश येण्याची ही पहिलीच वेळ आहे. बुमराहची ही गोलंदाजी शानदार होती आणि त्याने एकही धाव न करता हेडला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

india vs australia 4th test day 1

तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी

वॉशिंग्टन सुंदरने मार्नस लॅबुशेनला विराट कोहलीने झेलबाद केले. लॅबुशेनने 145 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने 72 धावा केल्यावर ते त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 22 वे अर्धशतक होते. लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी झाली होती.

बुमराहने उस्मान ख्वाजाला पॅव्हेलियनचा रस्ता

बुमराहने उस्मान ख्वाजाला पॅव्हेलियनमध्ये पाठवून भारताला दुसरे यश मिळवून दिलं. ख्वाजाने 121 चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने 57 धावा केल्या. त्याने मार्नस लॅबुशेनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली.

सॅम कॉन्स्टासने अर्धशतक

रवींद्र जडेजाने सॅम कॉन्स्टासला पॅव्हेलियनमध्ये पाठवल्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का 89 धावांवर बसला. कॉन्स्टासने 65 चेंडूत 60 धावांची शानदार खेळी केली, ज्यात त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. कॉन्स्टाससाठी ही खेळी खास होती कारण हा त्याचा पदार्पणाचा सामना होता. त्याने आपल्या फलंदाजीने प्रेक्षकांना प्रभावित केले. जडेजाच्या गोलंदाजीने कॉन्स्टाससमोर अडचणी निर्माण केल्या आणि अखेरीस त्याला बाद करण्यात यश मिळालं.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया : उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टन्स, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (क), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+