IND vs SL: भारत-श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक जाहीर, सामने केव्हा आणि कुठे खेळले जातील जाणून घ्या
India vs Sri Lanka Schedule: भारतीय संघ या महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाची घोषणा अजून व्हायची आहे. भारतीय संघ नवीन प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत तिथे जाणार आहे. दरम्यान, या मालिकेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही मालिका एकदिवसीय आणि टी-20 अशा दोन्ही प्रकारात खेळवली जाईल.

झिम्बाब्वे दौऱ्यावरून परतल्यानंतर भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्यावर जायचे आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर एक युवा भारतीय संघ असला तरी शुभमन गिल हा त्या संघाचा कर्णधार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना 26 जुलै रोजी होणार आहे. आधी फक्त टी-20 मालिका खेळावली जाणार आहे.
टी-20 मालिकेतील दुसरा सामना 27 जुलै रोजीच होणार आहे. त्यानंतर 29 जुलै रोजी तिसरा आणि अंतिम सामना होणार आहे. अशा प्रकारे ही मालिका अवघ्या चार दिवसांत संपणार आहे. यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळवली जाईल. टी-20 मालिकेतील सर्व सामने पल्लेकेले येथे होणार आहेत. 1 ऑगस्टपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ 4 ऑगस्टला तिथे आपला पुढचा सामना खेळणार आहे. तिसरा आणि अंतिम सामना 7 ऑगस्ट रोजी होणार आहे. यासह वनडे मालिका संपुष्टात येईल. एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने कोलंबोमध्ये खेळवले जातील.
T20 विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाची कामगिरी खराब झाली होती. संघ पहिल्या फेरीतून बाहेर पडला होता. यामुळे चाहत्यांचीही निराशा झाली आहे. दरम्यान, कॅप्टन वनिंदू हसरंगा यांनी आपले कर्णाधार पद सोडले आहे. हसरंगा यांनी राजीनामा सादर केला आहे. श्रीलंकन संघाला नवा कर्णधार मिळणार आहे.
दुसरीकडे T20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे भारतीय संघातही एक नवा टी-20 कर्णधार पाहायला मिळणार आहे. रोहित आणि कोहलीला वनडेमध्ये विश्रांती देण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत तेथेही नवा कर्णधार पाहायला मिळणार आहे. येत्या काही दिवसांत भारतीय संघाची घोषणा होणार आहे.












Click it and Unblock the Notifications