India vs Pakistan: भारत-पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी सामना कधी आणि कुठे होणार, अवघे काही दिवस बाकी
India vs Pakistan: हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाने सलग दोन सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करत विरोधी संघांना मोठ्या फरकाने पराभूत केले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या टीम इंडियाने हाच फॉर्म दाखवला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिला सामना चीनसोबत होता. भारताने एकतर्फी झालेल्या सामन्यात चीनचा 3-0 अशा मोठ्या फरकाने पराभव केला. यानंतर भारतीय संघाने पुढचा सामना जपानविरुद्ध खेळून तेथे ही आपली चमक दाखवून दिली.
भारताने जपानचाही मोठा पराभव केला. भारतीय संघाने जपानविरुद्धचा सामना 5-1 अशा मोठ्या फरकाने जिंकला. भारताचा पाकिस्तान विरुद्धचा सामना कधी होणार हा प्रश्न आहे. या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत . भारत-पाकिस्तान सामन्यासाठी दोन्ही देशांचे प्रेक्षक उत्सुक आहेत.

भारत-पाकिस्तान सामना कधी होणार?
या स्पर्धेतील बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना शनिवार, 14 सप्टेंबर रोजी होणार आहे. हा खेळ चीनमधील हुलुनबुर येथील मोकी प्रशिक्षण तळावर भारतीय वेळेनुसार दुपारी 1:15 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांकडे तयारीसाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत.
भारत आणि पाकिस्तानचा सामना कुठे बघायचा
14 सप्टेंबर रोजी चाहते सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर हा रोमांचक सामना थेट पाहू शकतात. भारतीय संघ अलीकडे वर्चस्व गाजवत आहे. मात्र, पाकिस्तानी संघही सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हॉकी सामना कोण जिंकणार?
अलीकडच्या कामगिरीवर नजर टाकली तर या सामन्यात टीम इंडियाचा वरचष्मा दिसतो. भारताने आपले दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले असले तरी पाकिस्तानला विजय मिळवता आलेला नाही. पाकिस्तानने या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने अनिर्णित ठेवले आहेत. ही परिस्थिती पाहता या सामन्यात टीम इंडिया पाकिस्तानला पराभूत करू शकते. पाकिस्तानचे नवे प्रशिक्षक ताहिर जमान निश्चितपणे आपल्या संघाला आवश्यक विजय मिळवून देण्यासाठी स्मार्ट रणनीती आखणार आखतील.
-
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य









Click it and Unblock the Notifications