Ind vs Eng : रोहित शर्मा 1 धाव करून बाद झाल्यानंतर चाहत्यांकडून सोशल मिडीयावर संताप

india vs england 3rd odi : भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने कटकमध्ये शानदार शतक झळकावून फॉर्ममध्ये परतला आहे.

आता रोहितची बॅट थांबणार नाही, असे वाटत असताना आज अहमदाबादमध्ये रोहित शर्मा फक्त 1 धाव करून स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. त्यानंतर यूजरकडून सोशल मिडीयावर संताप व्यक्त करत आहेत...

Rohit Sharma

फोटो सौजन्य- पीटीआय

इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हिटमॅन 13 धावा करुन 11000 एकदिवसीय धावा पूर्ण करेल अशा अपेक्षा होत्या, मात्र तो अपयशी ठरला आहे. रोहीत पहिल्याच षटकात 1 धाव काढल्यानंतर बाद झाला आहे. त्याच्या कामगिरीनंतर चाहत्यांची मोठी निराश सोशल मीडियावर स्पष्टपणे दिसून येत आहे.

या सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेत इंग्लंडच्या संघाने सलग तीनवेळा नाणेफेक जिंकली आहे. मात्र यापैकी पहिल्या दोन सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे तर आज तिसरा सामना खेळत आहेत.रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी कायम ठेवली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी दोन्ही संघांचा हा शेवटचा सामना आहे.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग

इंग्लंड संघ : जोस बटलर (कर्णधार), फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, टॉम बँटन, लियाम लिव्हिंगस्टोन, गस अ‍ॅटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड आणि साकिब महमूद

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+