चक दे इंडिया! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हाॅकीत भारताचा आर्यलँडवर विजय, साईराज -चिरागची विजयी घौडदौड
भारतानं हाॅकीत आर्यलँडवर २-० ने विजय मिळवला असून दुसरीकडे बॅडमिंटन पुरुष दुहेरीच्या क गटात भारतीय जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आपला बॅटमिंटनचा सामना जिंकला आहे. भारतीय जोडीने पहिला गेम 21-13 असा जिंकला होता.
भारत हाफ टाइममध्ये 2-0 ने आघाडीवर
हाफ टाइमपर्यंत भारतीय संघ 2-0 ने आघाडीवर होता. 21 व्या मिनिटाला आयर्लंडच्या जॉन मॅकीला गोल करण्याची संधी होती, मात्र भारताचा गोलरक्षक सुखजित सिंगने अप्रतिम बचाव करत त्याचा प्रयत्न हाणून पाडला.

हरमनचा सलग दुसरा गोल
हॉकी सामन्याच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. 19व्या मिनिटाला हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. हरमनचा हा चौथा गोल आहे. या गोलसह तो पॅरिस ऑलिम्पिकमधील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे.
भारत ब गटात अव्वल स्थानावर
हाॅकीत भारताने आयर्लंडचा 2-0 ने पराभव केलाम पूल बी मध्ये अव्वल स्थानावर आहे. भारतीय हॉकी संघाने पूल-बीमध्ये आयर्लंडचा 2-0 असा पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीतील आपला दावा मजबूत केला आहे. भारतीय संघाचा पुढील सामना 1 ऑगस्टला बेल्जियमशी होणार आहे.
बॅडमिंटन
सात्विक-चिराग जोडी जिंकली, इंडोनेशियन जोडीचा पराभव
बॅडमिंटन पुरुष दुहेरीच्या क गटात, सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने अल्फियान फझार आणि एर्दियान्तो मोहम्मद रायन या इंडोनेशियन जोडीचा 21-13, 21-13 असा सरळ गेममध्ये पराभव केला. हा सामना 40 मिनिटे चालला.
तिरंदाजी
भजन कौर उपांत्यपूर्व फेरीत
भारतीय तिरंदाज भजन कौरने महिलांच्या तिरंदाजीच्या वैयक्तिक गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्यांचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना ३ ऑगस्टला होणार आहे. भजनने फेरीच्या 16 मध्ये पोलंडच्या व्हायोलेटा मिशोरचा 6-0 असा पराभव केला. भजनने 28-23, 29-26 आणि 28-22 असे सलग तीन सेट जिंकले.












Click it and Unblock the Notifications