ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या ‘A' संघाची घोषणा; कोणाकडे धुरा, कोण आहेत 15 शिलेदार!
India A squad vs Australia A 2025 : आशिया कप २०२५ च्या संघात स्थान न मिळाल्यानंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय 'अ' संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्ध दोन बहुदिवसीय सामने खेळण्यासाठी निवड समितीने १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला असून, यात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे.

अय्यरच्या नेतृत्वाखालील 'अ' संघ
बीसीसीआयने घोषित केलेल्या या संघात श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे.
साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी आणि प्रसिद्ध कृष्णा यांसारख्या अलीकडच्या काळात चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंचाही संघात समावेश आहे.
हे दोन सामने अनुक्रमे १६ सप्टेंबर आणि २३ सप्टेंबरपासून लखनऊ येथे खेळवले जातील. यानंतर कानपूर येथे तीन एकदिवसीय सामनेही होतील.
🚨 Shreyas Iyer has been named captain of India A
— Cricbuzz (@cricbuzz) September 6, 2025
He will lead India A in two multi-day games against Australia A starting on September 16, 2025 #Cricket #CricketTwitter #indiacricket pic.twitter.com/WJ3AY6eJ3h
राहुल आणि सिराजचे पुनरागमन
या मालिकेतून के. एल. राहुल आणि मोहम्मद सिराज दुसऱ्या सामन्यापासून संघात परतणार आहेत. त्यामुळे, पहिल्या सामन्यातील दोन खेळाडूंना नंतर वगळले जाईल. ही मालिका अभिमन्यू ईश्वरन, तनुष कोटियन आणि एन. जगदीशन यांसारख्या खेळाडूंसाठी स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी आहे.
🚨 INDIA A SQUAD FOR THE MULTI-DAY MATCHES AGAINST AUSTRALIA A 🚨
— Indian Cricket News Updates (@IndianCric_News) September 6, 2025
Shreyas Iyer (C), Abhimanyu Easwaran, Jagadeesan (WK), Sai Sudharsan, Jurel (VC & WK), Padikkal, Harsh Dubey, Badoni, Nitish, Tanush, Prasidh, Gurnoor Brar, Khaleel, Manav Suthar, Yash Thakur. pic.twitter.com/vWqh36Q5ox
पडिक्कलसाठी पुनरागमनाची संधी
देवदत्त पडिक्कलसाठी ही मालिका पुनरागमनाचा मार्ग ठरू शकते. त्याने भारताकडून शेवटची कसोटी गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली होती. ही मालिका २ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडीजच्या भारत दौऱ्याची पूर्वतयारी मानली जात आहे.
या मालिकेतील चांगली कामगिरी खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी मदत करू शकते. निवड समितीने दिलेल्या या संधीचा उपयोग हे खेळाडू कसा करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या मालिकेसाठी भारत 'अ' संघ:
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिमन्यु ईश्वरन, एन जगदीसन, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, हर्ष दुबे, आयुष बडोनी, नितीश कुमार रेड्डी, तनुष कोटियन, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, खलील अहमद, मानव सुथार, यश ठाकूर.












Click it and Unblock the Notifications