Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND-W vs SL-W : श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज! सामना कधी आणि कुठे पाहाल? वाचा

IND-W vs SL-W 3rd T20I : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत विजयाचा अश्वमेध दौडवत आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील 'वुमेन इन ब्लू'ने ५ सामन्यांच्या मालिकेत आधीच २-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे. आज, शुक्रवारी (२६ डिसेंबर) तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड स्टेडियमवर होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात टाकण्याचा भारताचा निर्धार आहे. दुसरीकडे, श्रीलंकेसाठी हा सामना 'करो या मरो' असा असून मालिका जिवंत ठेवण्यासाठी त्यांना आज कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे.

IND-W vs SL-W 3rd T20I Match

भारताचे वर्चस्व, श्रीलंकेची धडपड

विशाखापट्टणम येथे झालेले पहिले दोन्ही सामने भारताने एकतर्फी जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात ८ विकेट आणि दुसऱ्या सामन्यात ७ विकेट राखून मिळवलेल्या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांची सलामी जोडी तुफानी फॉर्ममध्ये आहे, तर गोलंदाजीत अरुंधती रेड्डी आणि स्नेह राणा यांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना जखडून ठेवले आहे. श्रीलंकेची भिस्त पुन्हा एकदा त्यांची कर्णधार चमारी अटापट्टूवर असेल.

सामना कधी आणि कुठे पाहाल?

  • तारीख: शुक्रवार, २६ डिसेंबर २०२५
  • वेळ: संध्याकाळी ७:०० वाजता (टॉस संध्याकाळी ६:३० वाजता)
  • ठिकाण: ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम.
  • थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (टीव्ही) आणि जिओस्टार (JioStar) ॲप व वेबसाईटवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

भारतीय संघात होणार मोठे बदल?

मालिका विजयाचे लक्ष समोर असले तरी, भारतीय संघ आपली बेंच स्ट्रेंथ आजमावून पाहण्याची शक्यता आहे. सलग दोन विजयांनंतर संघ व्यवस्थापन काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संधी देऊ शकते. विशेषतः गोलंदाजी विभागात काही नवीन चेहरे दिसण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग ११

भारताचा संभाव्य संघ :

स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, श्री चरणी.

श्रीलंकेचा संभाव्य संघ :

विश्मी गुणरत्ने, चमारी अटापट्टू (कर्णधार), हासिनी परेरा, हर्षिता समरविक्रमा, नीलाक्षी डी सिल्वा, कविशा दिलहारी, कौशानी नुथ्यंगना (यष्टीरक्षक), मलकी मदारा, इनोका राणावीरा, काव्या कविंदी, शशिनी गिम्हानी.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+