Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs WI भारताचे आज भवितव्य ठरणार! वेस्ट इंडीजशी 'करो या मरो' सामना; वाचा पिच रिपोर्ट, हवामान अहवाल

Ind vs wi t20 world cup 2026 super 8 weather pitch report marathi : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीतील शेवटचा आणि अत्यंत निर्णायक सामना आज कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील हा सामना एका 'क्वार्टर फायनल'सारखाच आहे. या गटातून दक्षिण आफ्रिकेने आधीच उपांत्य फेरीत धडक मारली असून, आज जो संघ जिंकेल तो अंतिम चारमध्ये स्थान मिळवणारा दुसरा संघ ठरेल. भारतासाठी हा सामना जिंकणे अनिवार्य आहे; पराभव झाल्यास टीम इंडियाचे विश्वचषकाचे स्वप्न भंगणार आहे.

Ind vs wi t20 world cup 2026

हवामान आणि खेळपट्टीचा अंदाज (Weather & Pitch Report)

कोलकात्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आज पावसाची कोणतीही शक्यता नाही. 'एक्यूवेदर'नुसार दिवसभर आकाश निरभ्र राहील. सामन्याच्या वेळी तापमान २७°C च्या आसपास असेल.

खेळपट्टी कशी आहे?

ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजीसाठी नंदनवन मानली जाते. या स्पर्धेत येथे ८.५९ च्या सरासरीने धावा झाल्या आहेत.

टॉसचा फॅक्टर काय?

आकडेवारीनुसार, येथे पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने ५ पैकी ४ सामने जिंकले आहेत. मात्र, संध्याकाळी पडणाऱ्या दव (Dew) मुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.

दोन्ही संघांचे 'हेड टू हेड' (Head-to-Head)

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात जागतिक टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे, पण आकडेवारीनुसार, भारताचे वर्चस्व राहिले आहे.

  • एकूण सामने: ३०
  • भारताचे विजय: १९
  • वेस्ट इंडीजचे विजय: १०
  • निकाल नाही: ०१

सामना कधी, कुठे आणि कसा पाहाल?

  • तारीख: १ मार्च २०२६ (रविवार)
  • वेळ: भारतीय वेळेनुसार रात्री ७:३० वाजता (नाणेफेक ७:०० वाजता)
  • स्थळ: ईडन गार्डन्स, कोलकाता.
  • लाईव्ह टेलिकास्ट: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network).
  • लाईव्ह स्ट्रीमिंग: डिस्ने+ हॉटस्टार (Disney+ Hotstar) ॲपवर.

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत

सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

वेस्ट इंडीज

शाई होप (कर्णधार), ब्रँडन किंग, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, अकेल होसेन.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+