Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs SL Match Free Live भारत vs श्रीलंका महिला वर्ल्डकप, लाईव्ह मॅच बघा फ्रि! फक्त हे छोटे काम करा

IND vs SL Match Free Live How to Watch : आशिया कप स्पर्धेचा नुकताच थरार संपला. यात भारतीय पुरुष संघाने बाजी मारली आणि पाकड्यांना चारीमुंड्या चीत केले. त्यानंतर महिला वनडे विश्वचषक २०२५ चा थरार आज, मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ पासून सुरू होत आहे! सह-यजमान असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघ आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. गुवाहाटी येथील एसीए स्टेडियम, बारसापारा येथे हा ऐतिहासिक उद्‌घाटन मुकाबला होणार असून, दोन्ही संघ विजयी सलामी देण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत.

IND vs SL Match Free Live How to Watch

हरमन प्रित कर्णधार, विश्वचषकात उलटफेर होणार..

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पहिल्या सामन्यात मजबूत आत्मविश्वासाने उतरत आहे. विश्वचषकापूर्वीच्या सराव सामन्यात भारताने न्यूझीलंडला चार विकेट्सने पराभूत करत आपली शानदार फॉर्म सिद्ध केली आहे. दुसरीकडे, श्रीलंकेला त्यांच्या सराव सामन्यात बांगलादेशविरुद्ध केवळ एका धावेने निसटता पराभव पत्करावा लागला होता, त्यामुळे हा संघ मोठ्या उलथापालथीच्या प्रयत्नात असेल.

Take a Poll

मोबाईलवर सामना पाहा एकदम 'फ्री' (IND vs SL Match Free Live How to Watch)

जे क्रिकेट चाहते स्टेडियममध्ये उपस्थित राहू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हा सामना घरबसल्या पाहण्याची सोय उपलब्ध आहे. ही खास सोय पैसे खर्च न करता त्यांना उपलब्ध होऊ शकेल.

टीव्हीवर लाईव्ह प्रक्षेपण : भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेल्सवर (हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये) उपलब्ध असेल.

मोबाईलवर फ्री स्ट्रीमिंग : जे चाहते आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर सामना पाहू इच्छितात, त्यांच्यासाठी JioHotstar प्लॅटफॉर्मवर (ॲप आणि वेबसाइट) याची ऑनलाइन स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

सोपी गोष्ट : महत्त्वाचे म्हणजे, जिओ हॉटस्टारवर हा सामना मोबाईल वापरकर्त्यांसाठी पूर्णपणे विनामूल्य पाहता येणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे फक्त जिओचे सिम कार्ड असणे आवश्यक आहे.

सामना आणि वेळापत्रक

आजच्या या विश्वचषकाच्या उद्‌घाटन सामन्यात एक जबरदस्त टक्कर अपेक्षित आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विजयाची लय कायम ठेवू इच्छितो, तर चमारी अथापथुच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ धक्कादायक निकाल देण्याच्या तयारीत आहे.

सामना कितवा : भारत महिला (IND-W) विरुद्ध श्रीलंका महिला (SL-W), उद्‌घाटन मुकाबला

स्थळ कुठे आहे: एसीए स्टेडियम, बारसापारा, गुवाहाटी

नाणेफेकीची वेळ काय : दुपारी २:३० वाजता (IST)

सामना सुरू होण्याची वेळ किती : दुपारी ३:०० वाजता (IST)

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+