Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs SL Final: महाराष्ट्राची लेक स्मृती मंधानाचा धमाका! वनडे सामन्यात 11 वे शतक, 'हा' केला विक्रम

IND vs SL Final Smriti Mandhana hits 11th ODI century : भारतीय संघाच्या फलंदाजीचा कणा असलेली महाराष्ट्राची कन्या स्मृती मानधनाने आज अकरावे शतक झळकावले आहे. आज श्रीलंका महिला संघ (SL-W) आणि भारतीय महिला संघ (IN-W) यांच्यात कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर महिला तिरंगी मालिकेच्या अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात तिने ही किमया साधली आहे.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीस आलेली भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाने तिच्या बॅटने आज जोरदार कामगिरी केली. ग्रँड फिनालेमध्ये तिने एकदिवसीय क्रिकेटमधील 11 वे शतक झळकावून एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

IND vs SL Final Smriti Mandhana hits 11th ODI century

भारतीय सलामीवीर मानधना आणि प्रतीक रावल (30) यांनी सावध सुरुवात केली आणि पहिल्या 5 षटकांत फक्त 14 धावा केल्या. तथापि, नंतर त्याने धावांचा वेग वाढवला. रावल बाद होण्यापूर्वी दोघांनी 70 धावा जोडल्या. त्यानंतर मंधानाला हरलीन देओलच्या रूपात आणखी एक मजबूत जोडीदार मिळाला, दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 100 पेक्षा जास्त धावा जोडल्या. दरम्यान,50 धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर मानधना विशेषतः आक्रमक दिसली.

मानधनाने हा केला विक्रम

महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये हे मानधनाचे 11 वे एकदिवसीय शतक आज तिने झळकावले. एकदिवसीय सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंग ही 15 शतकासह पहिल्या, न्यूझीलंडच्या सुझी बेट्स 13 शतकासह दुसऱ्या तर 11 शतकासह स्मृती मानधना ही तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मानधनाच्या बॅटमधून किती धावा निघाल्या?

स्मृती मानधना हिने आतापर्यंत 101 एकदिवसीय सामना खेळले असून आजचा 102 वा एकदिवसीय सामना आहे. मानधनाने 46 पेक्षा जास्त सरासरीने (31 वेळा 50) 4,450 धावा पूर्ण केल्या आहेत. श्रीलंकेविरुद्ध हे तिचे पहिले शतक होते आणि आता तिने त्यांच्याविरुद्ध 600 धावा पूर्ण केल्या आहेत.

कोण आहे स्मृती मानधना, सर्व माहिती

स्मृती श्रीनिवास मानधना हिचा जन्म 18 जुलै 995 रोजी झाला. ती भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. मानधना डाव्या हाताने फलंदाजी करते तर उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते. डब्ल्यूपीएल स्पर्धेत ती रॉयल चॅलेंजर्स, बेंगलोर या संघाकडून खेळणार आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये ती महाराष्ट्र राज्याकडून खेळते.

स्मृतीची संपत्ती किती आहे?

महाराष्ट्राची कन्या स्मृती मानधना हिची अंदाजे 30 कोटींहून अधिक निव्वळ संपत्ती आहे, ती तिच्या केंद्रीय BCCI करार, ब्रँड एंडोर्समेंट्स आणि सतत विस्तारत असलेल्या महिला प्रीमियर लीग WPL मधून येते.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+