Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND Vs SA भारताचा आज आफ्रिकेविरुद्ध सामना; मोफत लाईव्ह मॅच कुठे पाहाल? वेळ, Live Streaming डिटेल्स

IND vs SA Women's World Cup 2025 : महिला विश्वचषकात भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरूच आहे! सलग दोन सामन्यांत दणदणीत विजय मिळवल्यानंतर 'टीम इंडिया' आज ९ ऑक्टोबर २०२५ आपल्या तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला भिडण्यासाठी सज्ज झाली आहे.

या सामन्यातून कर्णधार हरमनप्रीत कौर आणि गोलंदाज दीप्ती शर्मा यांचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला आहे, पण स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्स या स्टार फलंदाजांच्या बॅटमधून मोठी खेळी आलेली नाही. आज या दोघींकडून अपेक्षा आहे तर आजचा सामना जिंकून टीम इंडियाला केवळ विजय हॅट्ट्रिक पूर्ण करायची नाही, तर प्लेऑफमधील आपले स्थान अधिक मजबूत करायचे आहे.

IND Vs SA


भारतीय महिला क्रिकेट संघाने आज (९ ऑक्टोबर २०२५) आपल्या तिसऱ्या सामन्यासाठी कंबर कसली आहे. सलग तिसरा विजय मिळवण्याच्या उद्देशाने टीम इंडिया आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. कर्णधार हरमनप्रितकडूनही आज भारतीय संघाला आशा आहे कारण हरमनप्रीत कौर या स्टार फलंदाजांच्या बॅटमधून अद्याप मोठे रन्स आलेले नाहीत. आज तिच्याकडून धमाकेदार खेळीची अपेक्षा आहे, तर दुसरीकडे स्नेह राणा आणि दीप्ती शर्मा यांनी गोलंदाजीत चांगली कामगिरी बजावली आहे.

महिला विश्वचषकातील हा भारतीय संघाचा तिसरा सामना असल्याने आज हा थरार तुम्ही दुपारी ३ वाजल्यापासून पाहू शकता. ही तगडी झुंज फ्रीमध्ये कशी पाहायची, चला जाणून घेऊया!

IND vs SA भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याची संपूर्ण माहिती

  • सामना: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (महिला विश्वचषक)
  • स्थळ: विशाखापट्टणम
  • वेळ: दुपारी ३:०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
  • टॉस: दुपारी २:३० वाजता

सामना लाईव्ह कुठे पाहाल?

माध्यम चॅनल/ॲप फ्रीमध्ये पाहण्याचा पर्याय

  • टीव्ही प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports) डीडी स्पोर्ट्स (DD Sports) चॅनलवर फ्री मध्ये पाहता येईल.
  • ओटीटी / मोबाईल जिओ सिनेमा + हॉटस्टार (JioCinema + Hotstar) ओटीटी ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह पाहता येईल. त्यामुळे घाई करा आणि आताच सामन्यासाठी वेळ काढून ठेवा.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (Playing XI)

भारतीय महिला संघ

स्मृती मंधाना, प्रतिका रावल, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चारणी, रेणुका ठाकुर/क्रांती गौड.

दक्षिण आफ्रिका महिला संघ

लॉरा वुल फार्ट, टॅझमिन ब्रिट्स, सुने लूस, मॅरिझान कॅप, एनेके बॉश, सिनालो जैफ्टा (विकेटकीपर), क्लोए ट्रायॉन, नादिन डी क्लार्क, एनेरी डर्कसेन/मासाबाता क्लास, आयाबोंगा खाका, नोंकुलुलेको मलाबा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+