IND vs SA ODI: भारतीय संघात मोठे फेरबदल; 'हे' 4 मोठे खेळाडू संघातून बाहेर! कर्णधारपदाची धुरा राहूलवर
Ind vs Sa odi squad : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने अखेर टीम इंडियाची घोषणा केली आहे. नियमित कर्णधार शुभमन गिल दुखापतीमुळे बाहेर झाला आहे, ज्यामुळे संघाची कमान केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. मात्र, गिल आणि श्रेयस अय्यर यांच्यासह एकूण चार महत्त्वाच्या खेळाडूंना या संघातून वगळण्यात आले आहे. मागील मालिकेत निराशाजनक कामगिरी केलेले मोहम्मद सिराज आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांचाही या 'धुरंधरांच्या' यादीत समावेश आहे.

टीम इंडियातून पत्ता साफ झालेले ४ प्रमुख खेळाडू
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात दुखापत आणि कामगिरीमुळे मोठे बदल करण्यात आले आहेत.
१. शुभमन गिल (Shubman Gill): नियमित कर्णधार आणि सलामीवीर शुभमन गिल याला मानेच्या दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे. त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुलकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे, जो यष्टीरक्षकाची भूमिकाही पार पाडेल.
२. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer): ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील वनडे मालिकेत बरगडीला दुखापत झाल्यामुळे श्रेयस अय्यरला विश्रांती देण्यात आली आहे. तो सध्या या दुखापतीतून सावरत आहे.
३. मोहम्मद सिराज (Mohammed Siraj): ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील वनडे मालिकेत खराब कामगिरी केल्यामुळे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संघातून वगळण्यात आले आहे. तीन सामन्यांमध्ये त्याला फक्त दोन विकेट्स घेता आल्या होत्या.
४. अक्षर पटेल (Axar Patel): अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल यालाही संघात जागा मिळाली नाही. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली होती. तीन सामन्यांत त्याने ७५ धावा करण्यासोबतच तीन विकेट्स घेतल्या होत्या.
वरुण चक्रवर्ती : याव्यतिरिक्त, वरुण चक्रवर्ती या फिरकीपटूला, ज्याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यालाही वगळण्यात आले आहे.
हार्दिक पंड्या : एशिया कप २०२५ दरम्यान दुखापतग्रस्त झाल्यामुळे हार्दिक पंड्या अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. तो प्रथम सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बडोद्यासाठी आपली मॅच फिटनेस सिद्ध करेल, त्यानंतरच तो टी-२० मालिकेत खेळण्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची भारतीय एकदिवसीय टीम
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार) (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, रुतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल.












Click it and Unblock the Notifications