रोहीत शर्मा नव्हे सुनील शेट्टीच्या जावयाला मिळणार आफ्रिकेविरुद्ध वनडेत भारतीय संघाचे कर्णधारपद!
IND vs SA ODI sheduld : स्टार फलंदाज शुभमन गिलच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची चर्चा शिगेला पोहोचली आहे. सुरुवातीला रोहित शर्माचे नाव समोर येत असताना, आता एका ३३ वर्षीय अनुभवी खेळाडूचे नाव चर्चेत आले आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून, प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीचा जावई आहे! आता भारतीय संघाची धुरा या खेळाडूकडे येऊ शकते, हा खेळाडू कोण आणि वनडे मालिकेचे वेळापत्रक कसे असेल हे जाणून घेऊया.

हा स्टार क्रिकेटर सुनील शेट्टीचा जावई
मीडिया रिपोर्टनुसार, सिनेस्टार सुनील शेट्टी यांचा जावई दुसरा-तिसरा कुणी नसून भारतीय संघातील स्टार फलंदाज के.एल. राहूल आहे, त्याने २३ जानेवारी २०२३ रोजी अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आणि बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टीशी लग्नगाठ बांधली. आता भारतीय संघाचे कर्णधारपद राहुलला मिळण्याची दाट शक्यता आहे, कर्णधारपदाचा अनुभव आणि त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील दमदार कामगिरी पाहता, त्याला टीम इंडियाची धुरा मिळू शकते. संघाची अधिकृत घोषणा उद्या (आज रविवार, २३ नोव्हेंबर २०२५) होण्याची शक्यता आहे. या संदर्भात वनइंडिया हिंदीने वृत्त दिले आहे.
कर्णधारपदाची धुरा राहुलकडे?
मिडिया रिपोर्टनुसार, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी केएल राहुलला कर्णधार बनवले जाण्याची शक्यता आहे. ३३ वर्षीय राहुल भारतीय संघात नियमित खेळत असून, त्याचा अनुभव लक्षात घेऊन निवडकर्ते त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवू शकतात. राहुलने यापूर्वी १२ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले असून, त्यापैकी ८ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. तसेच, तो यापूर्वी उपकर्णधारही राहिला आहे, ज्यामुळे त्याचा दावा आणखी मजबूत होतो. मालिकेसाठी उपकर्णधार असलेला श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बाहेर आहे. त्यामुळे नवा कर्णधार मिळणे निश्चित आहे.
दिग्गजांवर लक्ष
या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली दीर्घकाळानंतर घरच्या मैदानावर एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसतील. या दोन्ही दिग्गजांवर चाहत्यांच्या नजरा खिळलेल्या असतील. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे शतक झळकावले होते, ज्यामुळे तो उच्च क्रमवारीवर पोहोचला होता.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मॅच वेळापत्रक
- पहिला वनडे, ३० नोव्हेंबर (२०२५): रांची
- दुसरी वनडे, ३ डिसेंबर (२०२५) : रायपूर
- तिसरी वनडे , ६ डिसेंबर (२०२५) : विशाखापट्टणम
के. एल. राहूलची वनडेतील सुरुवात अन् महत्वाची कामगिरी
केएल राहुलने ११ जून २०१६ रोजी झिम्बाब्वेविरुद्ध हरारे येथे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. राहुलने त्याच्या पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यातच शतक झळकावले होते. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला होता. राहुलने त्याच्या कारकिर्दीत सलामी फलंदाज, मधल्या फळीतील फलंदाज तसेच यष्टिरक्षक अशा विविध भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications