Ind vs sa 4th T20: आज चौथा टी-20 थरार; आफ्रिकेविरुद्ध भारत सज्ज! 'फ्रि' लाईव्ह मॅच कुठे बघायचा? वाचा
Ind vs sa 4th t20 live streaming free details playing 11 :
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेचा थरार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे! आज बुधवारी १७ डिसेंबर, रोजी लखनऊच्या इकाना स्टेडियमवर होणाऱ्या चौथ्या सामन्यात मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. अक्षर पटेलची अनुपस्थिती आणि सूर्याचा फॉर्म याकडे सर्वांचे लक्ष असतानाच, क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे हा सामना घरबसल्या 'मोफत' पाहण्याची संधी उपलब्ध आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा हा सामना आहे. आज संध्याकाळी सात वाजता सामना सुरु होईल. या मालिकेत सध्या भारतीय संघ २-१ ने आघाडीवर असून, आजचा सामना जिंकून ३-१ अशी अजिंक्य आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे.
इकानामध्ये आज 'सूर्या' चमकणार का?
भारतीय संघासाठी चिंतेची बाब म्हणजे अष्टपैलू अक्षर पटेल आजारपणामुळे मालिकेतून बाहेर झाला आहे, तर जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावरही अद्याप प्रश्नचिन्ह आहे. अशा परिस्थितीत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या फॉर्मकडे सर्वांचे लक्ष असेल. कर्णधार म्हणून सूर्याचा रेकॉर्ड ८० टक्क्यांपेक्षा जास्त विजयाचा असला तरी, त्याच्या बॅटमधून मोठी खेळी येणे आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
दक्षिण आफ्रिकेचे 'क्विंटन' अस्त्र!
मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला आज विजय अनिवार्य आहे. त्यांच्याकडून सलामीवीर क्विंटन डी कॉक हा सर्वात मोठा धोका ठरू शकतो, ज्याने दुसऱ्या सामन्यात अवघ्या ४६ चेंडूत ९० धावा कुटल्या होत्या. इकानाची खेळपट्टी सुरुवातीला फलंदाजांना पूरक असल्याने आज हाय-स्कोअरिंग सामना होण्याची शक्यता आहे.
मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहाल?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा टी-२० सामना आज संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होईल. टीव्हीवर हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क तर मोफत ऑनलाईन सामन्याचे थेट प्रक्षेपण JioHotstar ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. विशेष म्हणजे, JioHotstar वर चाहते विना सबस्क्रिप्शन हा सामना मोफत पाहू शकतात असे 'वनइंडिया हिंदी'च्या वृत्तात म्हटले आहे.
भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेईंग इलेव्हन : रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एडन मार्कराम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन.












Click it and Unblock the Notifications