Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs SA : दुसऱ्या T20 मॅच भारत की आफ्रिका जिंकणार? 'या' संघाचे पारडे जड; हेड टू हेड रेकॉर्ड, वाचा

IND vs SA 2nd T20 Prediction Who Will Win Today Head to Head : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना आज मुल्लांपूर येथे खेळला जाईल. कटक येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीसमोर पाहुण्या आफ्रिकी संघाची पुरती धूळधाण झाली होती. संपूर्ण संघ केवळ ७४ धावांवर गारद झाल्याने तो सामना पूर्णपणे एकतर्फी झाला.

आता मुल्लांपूरच्या मैदानात दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आणि मालिका १-१ ने बरोबरीत आणण्यासाठी मैदानात उतरेल, तर भारतीय संघ मालिकेत आपली २-० अशी आघाडी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.

IND vs SA 2nd T20 Prediction Who Will Win Today Head to Head

हेड टू हेड रेकॉर्ड: भारत vs दक्षिण आफ्रिका

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील आकडेवारी सातत्याने भारताच्या बाजूने झुकलेली आहे.

आकडे बोलतात..

एकूण सामने - ३२

  • भारत विजयी - १९
  • दक्षिण आफ्रिका विजयी - १२
  • अनिर्णित - १
  • हेड टू हेड - (भारताचे पारडे जड)

आजचा सामना कोण जिंकणार?

मागील सामन्यातील भारताची जबरदस्त फॉर्म आणि टी-२० मधील हेड टू हेड आकडेवारी पाहता, आजच्या सामन्यातही टीम इंडियाचे पारडे जड दिसत आहे. जर भारतीय संघाने कटकच्या सामन्यातील कामगिरी कायम राखली, तर भारताचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी आजचे काम खूपच कठीण असणार आहे.

मुल्लांपूरची खेळपट्टी कशी असेल?

बॅटिंगसाठी अनुकूल: मुल्लांपूरची खेळपट्टी साधारणपणे फलंदाजांसाठी सहायक मानली जाते.

स्विंग: नवीन चेंडूने थोडा स्विंग बघायला मिळू शकतो.

ड्यू फॅक्टर : तापमान आणि हवामानामुळे सामन्याच्या उत्तरार्धात ड्यू (दव) पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे थोडे आव्हानात्मक ठरू शकते.

टीम इंडिया - संभाव्य खेळाडू : कर्णधार सूर्यकुमार यादव, फलंदाज - अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, विकेटकीपर - जितेश शर्मा, संजू सैमसन, गोलंदाज/अष्टपैलू - अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, हर्षित राणा

दक्षिण आफ्रिका - संभाव्य खेळाडू - कर्णधार एडेन मार्कराम, फलंदाज - ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, डेविड मिलर, रीज़ा हेंड्रिक्स, विकेटकीपर - क्विंटन डिकॉक, गोलंदाज/अष्टपैलू - मार्को यानसेन, केशव महाराज, लिथो सिपामला, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्ट्जे

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+