IND vs PAK Women's World Cup 2025 : भारत vs पाकिस्तान मॅच 'फ्री' मध्ये कशी बघायची? जाणून घ्या
IND vs PAK Women's World Cup 2025 : आज, रविवार, ५ ऑक्टोबर २०२५, क्रिकेट जगतातील सर्वात मोठी आणि थरारक लढाई पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे! आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये, हरमनप्रीत कौरच्या 'विजेत्या' भारतीय महिला संघाने आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाला आव्हान दिले आहे.

कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणारा हा सामना केवळ क्रिकेटचा नसून, तो भावनांचा आणि अस्मितेचा संग्राम आहे! वनडे क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तानवर भारताचा दबदबा असला तरी, फातिमा सना यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी टीम हा इतिहास मोडून एक नवा अध्याय लिहिण्यास उत्सुक आहे. एकीकडे विजयाचा सिलसिला कायम ठेवण्याचा भारताचा निर्धार, तर दुसरीकडे उलटफेर करण्याची पाकिस्तानची तयारी... या हाय-व्होल्टेज सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत!
सामन्याची वेळ आणि वातावरणाचे आव्हान
- हा रोमांचक सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता सुरू होईल.
- नाणेफेक (Toss) दुपारी २:३० वाजता होईल.
गेल्या काही दिवसांत कोलंबोमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे एक सामना रद्द झाला होता. त्यामुळे आजच्या सामन्यावर क्रिकेट चाहते आणि खेळाडूंचे हवामानाकडेही बारकाईने लक्ष असेल.
स्मृती मानधना, दीप्ती शर्माकडून अपेक्षा
स्मृती मानधना, दीप्ती शर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांसारख्या दिग्गजांमुळे भारताने या स्पर्धेची शानदार सुरुवात केली आहे. पाकिस्तानला मात्र अनुभवी फलंदाज सिदरा अमीन आणि फिरकीपटू नशरा संधू यांच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे.
भारत-पाकिस्तान मॅच 'फ्री' मध्ये कशी पाहाल?
या हाय-प्रोफाइल सामन्याचा आनंद घेण्यासाठी चाहत्यांना 'फ्री' आणि पेड (Paid) असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
मॅच टीव्हीवर फ्री कसा पाहाल : हा सामना डीडी स्पोर्ट्स (DD Sports) चॅनलवर प्रसारित केला जाईल. डीडी स्पोर्ट्सवर चाहते विनामूल्य (Free) सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
पेड टीव्ही चॅनेल्स: स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर तुम्ही तुमच्या पसंतीच्या भाषेत समालोचनासह सामना पाहू शकता.
ऑनलाइन स्ट्रीमिंग: हा महामुकाबला Jio Hotstar प्लॅटफॉर्मवर थेट स्ट्रीम केला जाईल. Jio Hotstar ॲप किंवा वेबसाइटवर सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही सामना लाईव्ह पाहू शकता.
असे आहेत भारत-पाकिस्तानचे संघ
भारतीय संघात कोण कोण?
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उप-कर्णधार), दीप्ती शर्मा, ऋचा घोष, यास्तिका भाटिया, रेणुका सिंह ठाकूर, स्नेह राणा, राधा यादव, जेमिमा रोड्रिग्स, हरलीन देयोल आणि अन्य.
पाकिस्तान संघात कोण कोण?
फातिमा सना (कर्णधार), मुनीबा अली सिद्दीकी (उप-कर्णधार), सिदरा अमीन, नशरा सुंधू, आलिया रियाज, डायना बेग आणि अन्य.












Click it and Unblock the Notifications