Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs PAK:आज भारत विरुद्ध पाक वनडे, चॅम्पियन्स ट्रॉफीत कसा आहे रेकॉर्ड, सर्वाधिक सामने कुणी जिंकले?

IND vs PAK Record : चॅम्पियन ट्राफीमध्ये आज 23 फेब्रुवारी 2025 भारत विरुद्ध पाकिस्तान हा महत्वाचा सामना होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय आणि पाकिस्तानी क्रीडा रसिक डोळे लावून बसले आहेत. या सामन्याला पारंपारिक महत्व असून एकमेकांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या दोन्ही संघातील हा सामना आज दुपारी दुबईत होत आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक हायहोल्टेज सामने खेळले गेले आहेत. आता 23 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा आपण भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात दुबई येथे सामना पाहायला मिळणा आहे. किक्रेटप्रेमी ही या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पाकिस्तानविरुद्ध भारताचा एकूण रेकॉर्ड चांगला आहे. या आशेने भारतीय क्रिकेट चाहते या सामन्याची वाट पाहत आहेत.

कोणाचा पगडा भारी, भारत की पाकिस्तान?

भारतीय संघाचा अलिकडचा फॉर्म पाकिस्तानपेक्षा चांगला असल्याचे दिसून येते आहे. भारताची मजबूत फलंदाजी आणि गोलंदाजाची फळी त्यांना कोणताही सामना जिंकण्यास मदत करू शकते. भारत आणि पाकिस्तान दुबईमध्ये 28 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. ज्यामध्ये पाकिस्तानने भारताचा 19 वेळा पराभव केला आहे. तर भारतीय संघाने पाकिस्तान विरुध्द फक्त 9 वेळा विजय मिळवला आहे. दुबईमध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानचा पगडा भारी राहिला आहे.

india vs pakistan

दोन्ही संघात अटीतटीचा सामना होणार

एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानने भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. दोन्ही संघांमधील सामने नेहमीच अटीतटीचे असतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना केवळ क्रिकेट प्रतिभेचे प्रदर्शन करत नाही तर हा एक अतिशय भावनिक सामना देखील आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशांचे लोक आतुरतेने वाटत पाहतात. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामना होण्याची अपेक्षा आहे.

भारतीय संघ विजय मिळवणार ?

आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान एकदिवसीय क्रिकेटमध्ये 135 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये पाकिस्तानने भारताला 73 वेळा पराभूत केलं आहे. भारतीय संघाने पाकिस्तानला 57 वेळा पराभूत केले आहे. गेल्या काही वर्षांबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघ पाकिस्तानवर वरचढ असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत सध्याच्या फॉर्मचा विचार करता भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हेड टू हेड रेकॉर्ड

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान पाच वेळा आमनेसामने आले आहेत. या आयसीसी स्पर्धेतही पाकिस्तान संघ आकडेवारीत मजबूत आहे. पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाला तीन वेळा पराभूत केले होते. भारतीय संघाला फक्त 2 सामन्यात पाकिस्तानला हरवता आले आहे. पाकिस्तानचा संघ शेवटचा 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात एकमेकांसमोर आले होते. पाकिस्तानने हा सामना 180 धावांनी जिंकला होता.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान कसा आहे रेकॉर्ड

चॅम्पियन्स ट्रॉफी 2004: पाकिस्तानने 3 विकेट्सने विजय मिळवला.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2009: पाकिस्तानने 54 धावांनी विजय मिळवला.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2013: भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2017: भारताचा 124 धावांनी विजय.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2017: पाकिस्तानने 180 धावांनी विजय मिळवला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+