Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs PAK: पाकिस्तानला आज रोहित शर्मा सोडणार नाही! 4 षटकार मारताच इतिहास बनणार, रेकाॅर्ड मोडणार

IND vs PAK match prediction : भारतीय संघ 23 फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान विरुद्ध एक महत्त्वाचा सामना खेळणार आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव करत भारताने या स्पर्धेची धमाकेदार सुरुवात केली. आता पाकिस्तानविरुद्धही विजयाची मालिका कायम ठेवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. या मोठ्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या बॅटकडून धावांची अपेक्षा असेल.

पाकिस्तानसाठी विजय आवश्यक आहे, त्यामुळे पाकिस्तानी संघावर दुहेरी दबाव आहे आणि या सामन्यात त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टीमुळे पराभवाचा धोका आहे. भारताविरुद्ध सामना हे पाकिस्तानसाठी नेहमीच मोठे आव्हान असते. जर पाकिस्तानने दुसरा सामनाही गमावला तर त्यांचा उपांत्य फेरीतील मार्ग कठीण होऊ शकतो. त्याचवेळी, भारताने पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली, यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुनावला आहे. अशा स्थितीत भारताला पराभूत करणे सोपे जाणार नाही.

IND vs PAK match prediction

IND vs PAK prediction : रोहित शर्माला इतिहास रचण्याची संधी

जर रोहित शर्माने या सामन्यात आणखी चार षटकार मारले तर तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल आणि पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय खेळाडू बनेल. सचिन तेंडुलकरने पाकिस्तानविरुद्धच्या 69 एकदिवसीय सामन्यांमध्ये 29 षटकार ठोकले होते, तर रोहित शर्माच्या नावावर आतापर्यंत 26 षटकार आहेत आणि तो दुसऱ्या स्थानावर आहे.

पाकिस्तानविरुद्ध रोहीतचा जोरदार रेकाॅर्ड

रोहित शर्माचा एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड जोरदार आहे. पाकिस्तानविरुद्ध 19 सामन्यांत खेळताना त्याने 51.35 च्या सरासरीने 873 धावा केल्या आहेत, जे त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीची साक्ष आहे. त्याचा 92.38 हा स्ट्राईक रेट देखील सिद्ध करतो की, तो केवळ सातत्यपूर्ण धावा करत नाही तर त्याचा डावही वेगाने पुढे जातो.

रोहित शर्माला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 9000 धावा पूर्ण करण्याची संधी खूप जवळ आली आहे आणि पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी ही कामगिरी करण्यात मदत करू शकते. आज त्याच्याकडून समस्त भारतीय क्रिकेट रसिकांना चांगल्या खेळाची अपेक्षा आहे.

IND vs PAK पूर्ण संघ भारत : रोहित शर्मा (c), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, KL राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद. शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.

IND vs PAK पूर्ण संघ पाकिस्तान : इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (c&wk), सलमान आगा, तय्यब ताहीर, खुशदील शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम अहमद खान, मोहम्मद हसन खान, नसीम खान, उम्मेद खान, रसीम खान कामरान गुलाम, फहीम अश्रफ.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+