Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पाकिस्तानला सर्वच फाॅरमॅटमध्ये भारताने लोळवले! टिळक वर्मा, निशांत ठरले T20 मॅचच्या विजयाचे शिल्पकार

IND vs PAK : कसोटी असो की वन-डे, वनडे असो की, टी२० भारताने सर्वच फाॅरमॅटमध्ये पाकिस्तानला मैदानावर लोळवले आहे. टीम इंडियासमोर पाकिस्तान नेहमीच नांगी टाकतो हे कधीच स्पष्ट झाले आहे. अगदी विश्वषकाच्या महत्वाच्या सामन्यातही मग कोणताही खेळ असो पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान भारताच्या आसपासही नाही.

कालच झालेल्या ACC T20 इमर्जिंग टीम एशिया कप 2024 स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले. भारताने या रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. यामध्ये विजयाचे शिल्पकार ठरते ते टिळक वर्मा आणि निशांत सिंधू.

IND vs PAK ACC T20 Emerging Team Asia Cup

7 धावांनी पाकिस्तानने सामना गमावला

ACC T20 इमर्जिंग टीम एशिया कप 2024 चा तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. अल अमरात येथील ओमान क्रिकेट अकादमीच्या मैदानावर खेळवण्यात आलेला हा सामना अतिशय रोमांचक होता. 183 धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ केवळ 176 धावा करू शकला आणि सात धावांनी सामना गमावला.

निशांत सिंधूचे एका षटकात 2 बळी

पाकिस्तानकडून यासिर खानने 22 चेंडूत 33 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावला. तर कासिम अक्रमने 21 चेंडूत 27 धावा केल्या. अंशुल कंबोजला पहिल्या दोन षटकांत दोन बळी घेण्यात यश आले. त्याने चार षटकांत ३३ धावा देत तीन बळी घेतले. दुसरीकडे, निशांत सिंधूने अवघ्या 29 चेंडूत 41 धावा देत एका षटकात दोन बळी घेतले.

टिळक वर्माची बहारदार खेळी

भारताचा कर्णधार तिलक वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 8 गडी गमावून 183 धावा केल्या. भारतासाठी कर्णधार टिळक वर्माच्या बॅटमधून सर्वाधिक धावा झाल्या. टिळक वर्माने 44 धावांची खेळी केली. अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंग यांनी पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. स्फोटक फलंदाजी करत अभिषेक शर्माने 35 धावा केल्या. तर यष्टीरक्षक फलंदाज प्रभसिमरन सिंगने ३६ धावा केल्या. याशिवाय नेहल वढेराने 25 धावांचे योगदान दिले. रमणदीप सिंग आणि आयुष बडोनी मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरले.

दोन्ही संघांची पुढील स्टे प्लेइंग इलेव्हन

भारत - तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), रमणदीप सिंग, अंशुल कंबोज, आयुष बडोनी, नेहल वढेरा, निशांत सिंधू, राहुल चहर, रसिक दार सलाम, वैभव अरोरा. आज का सामना कौन जीता: प्रो कबड्डी लीगमधील आजचा सामना कोणी जिंकला - तेलुगु टायटन्स विरुद्ध तामिळ थलायवास

पाकिस्तान - मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक/कर्णधार), यासिर खान, अराफत मिन्हास, ओमेर युसूफ, कासिम अक्रम, हसिबुल्ला खान, मेहरान मुमताज, अब्बास आफ्रिदी , शाहनवाज डहानी, अहमद दानियाल, मोहम्मद इम्रान, जमान खान.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+