Ind Vs NZ : 2 झेल सोडल्यानंतर 5 बळी; वरुण चक्रवर्तीच्या फिरकीवर भारताने न्यूझीलंडला अक्षरशः लोळवले
चॅम्पियन्स ट्रॉफी- २०२५ मधला रविवारी झालेला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना क्षेत्ररक्षणासाठी खास ठरला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच न्यूझीलंडने आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांना आश्चर्यचकित केले. ग्लेन फिलिप्सने एक अद्भुत झेल घेत विराट कोहलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर केन विल्यमसनने त्याच शैलीत रवींद्र जडेजाचा झेल घेतला. दुसरीकडे भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने कॅच सोडून तो चौकारही घालवला. या सगळ्या प्रकारानंतर ट्रोल झालेला वरुण चक्रवर्ती मात्र पाच विकेट घेऊन, आपल्या चुकीचे प्रायचित्त मात्र करुन गेला.

भारताचा ४४ धावांनी विजय
या सामन्यांत भारताने न्यूझीलंडचा ४४ धावांनी पराभव केला. भारताच्या २४९ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ फक्त २०५ धावा करु शकला. आता भारताचा सेमिफायनल ४ मार्चला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल. हा सामना दुबईच्या स्टेडिअमवर खेळवला जाईल.
वरुण चक्रवर्तीची जादू चालली
वरुण चक्रवर्तीने आपल्या फिरकी गोलंदाजीवर किवी संघाला अक्षरशः नाचायला लावले. वरुणने पाच विकेट घेतल्या. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सैटनर याला बाद करत वरुण धवनने आपल्या पाच विकेट पूर्ण केल्या. विशेष म्हणजे आपल्या दहाव्या षटकात त्याने दोन विकेट घेतल्या. मिचेल सैंटनर २८ रणांवर बाद झाला.
वरुणचे गचाळ क्षेत्ररक्षण
न्यूझीलंडच्या डावातील चौथ्या षटकात हार्दिक पांड्याच्या षटकात विल यंगने हवेत उंच शॉट मारला. मिड-ऑनवर तैनात असलेल्या वरुण चक्रवर्तीने झेल घेण्यासाठी धाव घेतली पण तो चेंडूचा अंदाज घेऊ शकला नाही. अर्थात हा चोंडू फ्री हिट होता मात्र वरुणला तो झेलता आला नाही. विशेष म्हणजे हा झेल सोडून वरुणचा पाय त्या बाँलला लागून तो चौकार गेला. त्यानंतर वरुणवर प्रचंड टिका झाली. वरुणचे क्षेत्ररक्षण पाहून हार्दिक पांड्याने डोके धरले, तर स्टेडियममध्ये उपस्थित असलेले भारतीय चाहतेही संतापले.
दुसऱ्यांदा सोडला झेल
एवढेच नाही तर यानंतर वरुणने २० व्या षटकात त्याच्या क्षेत्ररक्षणावरही निराशा केली. यावेळी कुलदीप यादवच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर केन विल्यमसनने स्वीप शॉट खेळला आणि चेंडू हवेत स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. इथे वरुणने डायव्ह मारला पण चेंडू पकडणे तर दूरच, त्याला तो स्पर्शही करता आला नाही. चेंडू त्याच्या हातातून गेला आणि न्यूझीलंडला ४ मिळाले.












Click it and Unblock the Notifications