IND vs NZ Final: या सामन्यानंतर रवींद्र जडेजा निवृत्त होणार का? कोहलीला मिठी मारून दिला इशारा
Ravindra Jadeja Retirement: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापूर्वी रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या विजेतेपदाच्या लढतीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली निवृत्त होतील अशी अटकळ होती. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीच्या बातम्यांदरम्यान आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. सोशल मीडियावर अशा बातम्या वेगाने पसरत आहेत की रवींद्र जडेजा अंतिम सामन्यानंतर निवृत्त होऊ शकतो.
रवींद्र जडेजा निवृत्त होणार का?
विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा हे तिघेही कदाचित शेवटचाच एकदिवसीय सामना खेळत आहेत, अशी चर्चा सोशल मिडीयावर यूजर करत आहेत. अफवांनुसार रोहित शर्मा अंतिम सामन्यानंतर मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्याशी त्याच्या भविष्याबद्दल चर्चा करेल. दरम्यान रवींद्र जडेजा आणि विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली रवींद्र जडेजाला घट्ट मिठी मारत आहे.

व्हिडीओ होतोय व्हायरल
10 षटके पूर्ण केल्यानंतर रवींद्र जडेजा विराट कोहलीला मिठी मारतो. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना काही वेळ मिठी मारली. ज्यामुळे चाहत्यांमध्ये अटकळ निर्माण झाली की हा जडेजाचा शेवटचा एकदिवसीय सामना आहे का. चाहत्यांनी या घटनेचा संबंध भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यानंतर कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यातील मिठीशी जोडला. कोहलीला मिठी मारल्यानंतर स्टीव्ह स्मिथने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
It's last match for Ravindra Jadeja in the ODIs Happy Retirement ❤️ pic.twitter.com/78eIxKwSWL
— Ahmed Says (@AhmedGT_) March 9, 2025
Virat Kohli hugged Ravindra Jadeja after he completed his last over. . Appreciation or Sign of Retirement? Jadeja playing his last ODI today ? #INDvsNZ pic.twitter.com/1FDYq9pjgS
— Shubhankar Mishra (@shubhankrmishra) March 9, 2025
It's Ravindra Jadeja's Last Match today.. Thank you sir Jadeja#INDvsNZ pic.twitter.com/DGiC4VdEDN
— Ravi Ranjan (@TuchIndia) March 9, 2025
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड: विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, विल्यम ओ'रोर्क, नाथन स्मिथ.












Click it and Unblock the Notifications