भारत-न्यूझीलंड कसोटीवर पावसाची शक्यता; बंगळुरूमध्ये कसे राहणार 5 दिवस वातावरण, वाचा सविस्तर
India vs New Zealand Test Match : भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना उद्यापासून बंगळुरु येथे सुरू होणार आहे. पण या कसोटीपूर्वीच क्रिकेट प्रेमींसाठी एक निराशाजनक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे हवामानाबद्दलची. चला तर जाणून घेऊया, उद्याच्या सामन्यावर पावसाचे सावट कसे असणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाऊस खलनायक ठरू शकतो. मंगळवारी बंगळुरूमध्ये पावसामुळे टीम इंडियाचे सराव सत्र रद्द करण्यात आले. हवामान वेबसाइट Accuweather नुसार, बुधवार, 16 ऑक्टोबरपासून पुढील 5 दिवस बेंगळुरूमध्ये पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या अंदानुसार, बुधवारी (16 ऑक्टोबर) बंगळुरूमध्ये पावसाची शक्यता 41 टक्क्यांपर्यंत असेल. या दिवशी कमाल तापमान 24 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहील. वाऱ्याचा वेग 32 किमी/ताशी असेल.
प्रामुख्याने हवामान विभागाच्या अंदाजानुसार विचार केला तर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 18 ऑक्टोबरला जास्तीत जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दिवशी 67 टक्क्यांपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सामन्याच्या उरलेल्या दिवशी पावसाची शक्यता 40 टक्के किंवा त्याहून कमी राहील. त्यामुळे ही दिलासा देणारी ही बाब महत्त्वाची आहे.
बंगळुरूमध्ये कसे राहणार 5 दिवस वातावरण
16 ऑक्टोबरला - 41%
17 ऑक्टोबर: 40%
18 ऑक्टोबर: 67%
19 ऑक्टोबर: 25%
20 ऑक्टोबर: 40%












Click it and Unblock the Notifications