IND vs NZ 1st ODI 2026: भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला वनडेचा आज थरार! वाचा कोण वरचढ, मॅच टाईम अन् संघ
IND vs NZ 1st ODI 2026 Match Date Time Playing XI and Venue : टी-२० विश्वचषक आणि आयपीएलच्या धामधुमीपूर्वी भारतीय संघ आपली शेवटची वनडे मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना वडोदरा येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा कर्णधार शुभमन गिल आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यावर असतील.

अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन रोहित शर्मा आणि विराट कोहली दीर्घकाळानंतर वनडे फॉरमॅटमध्ये परतत आहेत. जुलै २०२६ पर्यंत भारताची ही शेवटची वनडे मालिका असल्याने, हे दोन्ही दिग्गज खेळाडू या मालिकेत आपली छाप पाडण्यासाठी उत्सुक आहेत. सरावादरम्यान विराटने जवळपास दीड तास नेटमध्ये घाम गाळला, ज्यामध्ये त्याने वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंचा सामना केला. विजय हजारे ट्रॉफीमध्ये नुकत्याच केलेल्या शानदार कामगिरीमुळे (७७ आणि १३१ धावा) विराट प्रचंड फॉर्ममध्ये दिसत आहे.
शुभमन गिलसाठी महत्त्वाची मालिका टी-२० विश्वचषकाच्या संघातून वगळल्यानंतर शुभमन गिलचे हे पुनरागमन असून, यावेळी त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज यांनी गुरुवारीच विजय हजारे ट्रॉफीचा सामना खेळल्यामुळे त्यांनी सरावातून विश्रांती घेतली होती; मात्र ते निवडीसाठी उपलब्ध असतील.
सामन्याची वेळ आणि इतर सविस्तर तपशील
- तारीख: ११ जानेवारी २०२६
- वेळ: दुपारी १:३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
- स्थळ: वडोदरा
भारत वि. न्यूझीलंड (वनडे रेकॉर्ड Head to Head)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत झालेल्या वनडे सामन्यांची आकडेवारी पाहता टीम इंडियाने आपले वर्चस्व राखले आहे.
- एकूण सामने: १२०
- भारताचा विजय: ६२
- न्यूझीलंडचा विजय: ५०
- अनिर्णित (No Result): ७
- टाय (Tied): १
विशेष म्हणजे भारताने न्यूझीलंडविरुद्धचे शेवटचे ७ वनडे सामने सलग जिंकले आहेत.
भारतीय संघ
- १,शुभमन गिल (कर्णधार),फलंदाज
- २,श्रेयस अय्यर (उपकर्णधार),फलंदाज
- ३,रोहित शर्मा,फलंदाज
- ४,विराट कोहली,फलंदाज
- ५,यशस्वी जयस्वाल,सलामीवीर फलंदाज
- ६,ऋषभ पंत (यष्टीरक्षक),यष्टीरक्षक फलंदाज
- ७,के.एल. राहुल (यष्टीरक्षक),यष्टीरक्षक फलंदाज
- ८,रवींद्र जडेजा,अष्टपैलू (Allrounder)
- ९,वॉशिंग्टन सुंदर,अष्टपैलू
- १०,नितीश कुमार रेड्डी,फलंदाजी अष्टपैलू
- ११,कुलदीप यादव,फिरकी गोलंदाज
- १२,मोहम्मद सिराज,वेगवान गोलंदाज
- १३,अर्शदीप सिंग,वेगवान गोलंदाज
- १४,हर्षित राणा,वेगवान गोलंदाज
- १५,प्रसिद्ध कृष्णा,वेगवान गोलंदाज
न्यूझीलंड संघ (New Zealand Squad)
न्यूझीलंड संघाचे नेतृत्व अष्टपैलू खेळाडू मायकल ब्रेसवेल करणार आहे..
- १ मायकल ब्रेसवेल (कर्णधार) अष्टपैलू
- २ डॅरिल मिचेल फलंदाजी अष्टपैलू
- ३ ग्लेन फिलिप्स अष्टपैलू
- ४ डेव्हन कॉनवे यष्टीरक्षक फलंदाज
- ५ मिचेल हे (यष्टीरक्षक) यष्टीरक्षक फलंदाज
- ६ विल यंग फलंदाज
- ७ हेन्री निकोल्स फलंदाज
- ८ निक केली फलंदाज
- ९ काइल जेमिसन गोलंदाज
- १० आदित्य अशोक गोलंदाज
- ११ ख्रिस्तियन क्लार्क गोलंदाज
- १२ मायकल रे गोलंदाज
- १३ जेडन लेनॉक्स गोलंदाज
- १४ झॅक फॉल्क्स अष्टपैलू
- १५ जोश क्लार्कसन फलंदाजी अष्टपैलू












Click it and Unblock the Notifications