IND vs ENG: तिसऱ्या कसोटीत भारतीय संघात कोण असेल? कुणाला डच्चू! जाणून घ्या सामना LIVE कुठे बघायचा?
IND vs ENG Where to watch England vs India 3rd Test Live Telecast : भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील पाच सामन्यांच्या मालिकेत एक-एक अशी बरोबरी करणारे दोन्ही संघ आता तिसऱ्या कसोटीसाठी सज्ज झाले आहेत. भारताने पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात जोरदार पुनरागमन करत मुसंडी मारली आणि विजयश्री खेचून आणली. आता आज गुरुवार, १० जुलैपासून तिसरा आणि महत्वाचा कसोटी सामना होत आहे.
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत आहेत. एजबॅस्टन येथे इंग्लंडचा ३३६ धावांनी पराभव करून भारताने जोरदार पुनरागमन केले. आता तिसरा सामना १० जुलैपासून लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल.

कुठे होणार सामना कधी वेळ काय?
भारत आणि इंग्लड यांच्यातील तिसरा कसोटी सामना आज गुरुवारी १० जुलैपासून सुरु होणार आहे. हा सामना इंग्लंडच्या ऐतिहासिक लाॅड्स मैदानावर खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी ३.३० वाजता सुरु होईल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना JioHotstar App आणि वेबसाइटवर थेट प्रक्षेपित केला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होईल.भारतात टीव्हीवर इंग्लंड विरुद्ध भारत तिसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण प्रेक्षक सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात.
इरफान पठाणकडून प्लेइंग इलेव्हनची घोषणा
या सामन्यापूर्वी, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने त्याच्या संभाव्य भारतीय प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. इरफान पठाणने त्याच्या YouTube चॅनेलवर सांगितले की तो भारताच्या फलंदाजी लाइनअपमध्ये कोणत्याही मोठ्या बदलाच्या बाजूने नाही. त्याने पुन्हा एकदा केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांना सलामीची जबाबदारी दिली आहे. त्याच वेळी, खराब फॉर्म असूनही, करुण नायरला तिसऱ्या क्रमांकावर संधी देण्यात आली आहे.
जर सलामीवर अपयशी ठरले तर मधल्या फळीत भक्कम फलंदाजीसाठी त्याने कर्णधार शुभमन गिल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांना कायम ठेवले आहे. याशिवाय नितीश कुमार रेड्डी यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने नितीश रेड्डीवर विश्वास ठेवून त्याला संभाव्य संघात स्थान दिले आहे. अशा परिस्थितीत, त्याने त्याला संघात कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
कोण असतील गोलंदाज?
गोलंदाजी विभागात, इरफान पठाणने तीन प्रमुख वेगवान गोलंदाजांना स्थान दिले आहे. या गोलंदाजांना जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाशदीपच्या रूपात संघात समाविष्ट केले आहे. दुसऱ्या कसोटीत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती परंतु तो आज पुनरागमन करत आहे. यावर इरफान म्हणाला, बुमराहच्या पुनरागमनामुळे भारताला वेगवान गोलंदाजीला धार मिळेल.
इरफान पठाणचा संभाव्य भारतीय इलेव्हन
केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, करुण नायर, शुभमन गिल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, आकाशदीप, मोहम्मद सिराज.












Click it and Unblock the Notifications