चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वरुण चक्रवर्तीची एंट्री? T-20 मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीचं मिळालं बक्षीस
Champions Trophy 2025, Varun Chakravarthy: नुकत्याच झालेल्या भारत विरुध्द इंग्लंड टी-20 मालिकेत टीम इंडियाने शानदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाने ही मालिका 4-1 जिंकून चाहत्यांची मने जिंकली आहेत. आता टीम इंडिया 6 फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये खेळला जाणार आहे. भारतीय संघासाठी एकदिवसीय मालिका एक महत्त्वाचे आव्हान ठरू शकते.
वरुण चक्रवर्तीची संघात एन्ट्री?
दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे की, फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती नागपूरमध्ये टीम इंडियाच्या संघात सामील झाला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार वरुण चक्रवर्ती आगामी एकदिवसीय मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघासाठी महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. टी-20 मध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या वरुण चक्रवर्तीला आता एकदिवसीय संघातही संधी दिली जाऊ शकते.

फोटो सौजन्य- पीटीआय
वरुण चक्रवर्तीची टी-20 मालिकेत शानदार कामगिरी
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसोबतच आयपीएलमध्येही वरुण चक्रवर्तीची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. आयपीएलमधील शानदार कामगिरीमुळे वरुण चक्रवर्तीला संघात स्थान मिळालं आहे. त्याच्या संभाव्य पुनरागमनामुळे भारतीय संघाची गोलंदाजी आणखी मजबूत होऊ शकते. त्याची गोलंदाजी फलंदाजांना त्रास देऊ शकते. दरम्यान टीम इंडियाकडून अद्याप याबाबत कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात मिळणार संधी ?
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघ नागपुरात दाखला आहे. 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीला लक्षात घेता वरुणची इंग्लंड विरुध्द एकदिवसीय मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच वरुण चक्रवर्तीला चॅम्पियन्स ट्रॉफी संघात संधी दिली जाऊ शकते अशी शक्यता आहे. वरुण चक्रवर्ती गेल्या काही काळापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि तो सातत्याने संघासाठी विकेट घेत आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications