भारत Vs इंग्लंड 3ऱ्या कसोटी सामन्यात पाऊस त्रासदायी ठरणार का?, जाणून घ्या लंडनचे 5 दिवसांचे हवामान?
ind vs eng third test match london weather : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने पार पडले असून, पहिला सामना इंग्लंडने तर दुसरा सामना भारताने जिंकला आहे. त्यामुळे सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे.
तिसरा कसोटी सामना 10 जुलैपासून लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्यात पावसाचं धोका असणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. चला जर जाणून घेऊया, लंडनमधील पाच दिवसांचा हवामानाचा आढावा समजून घेऊया.

तिसऱ्या कसोटीच्या पाचही दिवसांचे हवामान:
पहिला दिवस (10 जुलै)
AccuWeather च्या अहवालानुसार, पहिला दिवस बहुतांश वेळा स्वच्छ राहणार आहे. या दिवशी तापमान उष्ण असणार असून, कमाल तापमान ३०°C आणि किमान तापमान १७°C राहील.
दुसरा दिवस (11 जुलै)
दुसऱ्या दिवशीही हवामान उष्ण राहणार आहे. या दिवशी कमाल तापमान ३०°C, तर किमान तापमान १७°C असेल. पावसाची शक्यता केवळ १% असल्यामुळे खेळावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही.
तिसरा दिवस (12 जुलै)
या दिवशी आकाशात ढग असले तरी उष्णतेचा जोर कायम राहणार आहे. कमाल तापमान ३०°C आणि किमान तापमान १७°C इतके अपेक्षित आहे.
चौथा दिवस (13 जुलै)
चौथ्या दिवशी आकाशात थोडेफार ढग असतील, मात्र तापमानात फारसा बदल अपेक्षित नाही. या दिवशी कमाल तापमान ३०°C, तर किमान तापमान १८°C असेल.
पाचवा दिवस (14 जुलै)
सामन्याचा शेवटचा दिवसही उष्ण राहणार असून, हवामान स्वच्छ असेल. कमाल तापमान 30°C, तर किमान तापमान 19°C राहण्याचा अंदाज आहे.
पाचही दिवसाच्या हवामानाच्या अंदाजानुसार, तिसऱ्या कसोटी सामन्याच्या सर्व दिवसांमध्ये पावसाची फारशी शक्यता नाही. त्यामुळे खेळात खंड पडण्याची शक्यता कमी आहे आणि चाहते देखील या सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
भारताने लॉर्ड्सवर शेवटचा सामना कसा जिंकला होता?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना २०२१ मध्ये लॉर्ड्सवर खेळला गेला होता. या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत करत १५१ धावांनी मोठा विजय मिळवला होता. हा विजय भारतीय संघासाठी ऐतिहासिक ठरला होता.
इंग्लंडचा नवा डाव, हा फास्ट गोलंदाज घेतला टीममध्ये!
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी अंतर्गत भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना १० ते १४ जुलै दरम्यान लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सनचा संघात समावेश केला आहे. रविवारी बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने यजमान संघावर 336 धावांनी विजय मिळवल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.












Click it and Unblock the Notifications