IND vs ENG 4th Test : चौथ्या कसोटीवर पावसाची छाया! जाणून घ्या प्लेईंग 11, खेळपट्टी कुणाला साथ देणार?
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लड यांच्यातील पाच कसोटी मालिकेचा चौथा कसोटी क्रिकेट सामना आज होणार आहे. या सामन्यावर पावसाची छाया आहे. त्यामुळे आता खेळ कधी सुरु होणार आणि पावसाचा किती व्यत्यय येणार हे हवामानच ठरवणार आहे. विशेष म्हणजे पाचही दिवस पावसाची या कसोटी सामन्यावर छाया राहील असा हवामान अंदाज आहे.
भार आणि इंग्लड संघांनी पहिल्या दोन कसोटीत एक-एक विजय मिळवत बरोबरी साधली होती, पण तिसरा कसोटी सामना फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे भारताने गमावला. त्यामुळे यावेळी टीम इंडिया फारच दक्ष आहे तर दुसरीकडे मालिका विजयासाठी इंग्लंडचा संघ आतूर आहे, पाच दिवस पावसाची छाया या कसोटीवर असल्याने भारत आपले मालिकेतील आव्हान कायम ठेवतो की इंग्लंडला मालिका विजयासाठी पुढच्या कसोटीवर अवलंबून राहावे लागते हे तूर्त तरी अस्पष्ट आहे.

आजपासून सुरु होणाऱ्या चौथ्या कसोटीत फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल, तर दुसरीकडे गोलंदाजांवर भारताची मदार अवलंबून असेल. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार असल्याची माहिती टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज याने दिली आहे. यापूर्वी बुमराहला कामाचा ताण टाळण्यासाठी फक्त तीन कसोटींसाठी मर्यादित ठेवले जाईल, असे वृत्त होते, परंतु आता सिराजच्या या विधानामुळे चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भारत Vs इंग्लंड चौथी कसोटी: हवामान आणि खेळपट्टी अहवाल
मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यावर हवामानाचे सावट आहे, तर खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अधिक अनुकूल ठरण्याची शक्यता आहे.
हवामान अहवाल (भारतीय वेळेनुसार)
सामना सुरू होण्याची वेळ: दुपारी 3:30 वाजता.
पावसाची शक्यता (सुरुवातीला): AccuWeather नुसार, सामना सुरू होताना 49% पावसाची शक्यता आहे. नाणेफेकीच्या (Toss) वेळेपासूनच पाऊस सुरू होऊ शकतो.
मुसळधार पावसाचा अंदाज: Next Stay नुसार, भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5:00 नंतर पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यादरम्यान सामन्याचा खेळ सुरु राहू शकतो.
रात्री पुन्हा पाऊस: रात्री 8:45 पर्यंत पुन्हा मुसळधार पाऊस सुरू होऊ शकतो.
पहिल्या दिवसाचा खेळ: पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ खूपच कमी वेळेसाठी होण्याची शक्यता आहे.
2. ओल्ड ट्रॅफर्ड खेळपट्टी अहवाल
खेळपट्टीचा प्रकार: ओल्ड ट्रॅफर्डचा इतिहास आणि पुढील 5 दिवस अपेक्षित ढगाळ वातावरण पाहता, ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अधिक उपयुक्त असेल.
या खेळपट्टीवर 25 वर्षात फिरकी गोलंदाजांची कामगिरी : 20 सामन्यांमध्ये 147 बळी. सरासरी: 39.95. इकॉनॉमी: 3.18
या खेळपट्टीवर 25 वर्षात वेगवान गोलंदाजांची कामगिरी : याच कालावधीत 477 बळी. सरासरी: 30 पेक्षा कमी.
चौथ्या डावात लक्ष्य पाठलाग
या मैदानावर चौथ्या डावात लक्ष्यांचा पाठलाग करणे कठीण राहिले आहे. फक्त चार संघांनाच लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करता आला आहे.
इंग्लड प्लेईंग 11 (Playing XI):
- झॅक क्रॉली (Zak Crawley)
- बेन डकेट (Ben Duckett)
- ऑली पोप (Ollie Pope)
- जो रूट (Joe Root)
- हॅरी ब्रूक (Harry Brook)
- बेन स्टोक्स (Ben Stokes) (कर्णधार)
- जेमी स्मिथ (Jamie Smith) (यष्टीरक्षक)
- लियाम डॉसन (Liam Dawson)
- ख्रिस वोक्स (Chris Woakes)
- ब्रायडन कार्स (Brydon Carse)
- जोफ्रा आर्चर (Jofra Archer)
इंग्लड संपूर्ण संघ (Egland Full Squad):
- झॅक क्रॉली (Zak Crawley)
- बेन डकेट (Ben Duckett)
- ऑली पोप (Ollie Pope)
- जो रूट (Joe Root)
- हॅरी ब्रूक (Harry Brook)
- बेन स्टोक्स (Ben Stokes) (कर्णधार)
- जेमी स्मिथ (Jamie Smith) (यष्टीरक्षक)
- लियाम डॉसन (Liam Dawson)
- ख्रिस वोक्स (Chris Woakes)
- ब्रायडन कार्स (Brydon Carse)
- जोफ्रा आर्चर (Jofra Archer)
- जोश टंग (Josh Tongue)
- गस अॅटकिन्सन (Gus Atkinson)
- जेकब बेथेल (Jacob Bethell)
2. टीम इंडिया संपूर्ण संघ (Team India Full Squad)
- यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal)
- केएल राहुल (KL Rahul)
- करुण नायर (Karun Nair)
- शुभमन गिल (Shubman Gill) (कर्णधार)
- ऋषभ पंत (Rishabh Pant) (यष्टीरक्षक)
- रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)
- वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar)
- अंशुल कंबोज (Anshul Kamboj)
- आकाश दीप (Akash Deep)
- जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)
- मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)
- अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran)
- कुलदीप यादव (Kuldeep Yadav)
- शार्दुल ठाकूर (Shardul Thakur)
- प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna)
- साई सुदर्शन (Sai Sudharsan)
- ध्रुव जुरेल (Dhruv Jurel)
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications