भारत-इंग्लंडमधील चौथा टी-20 सामना कधी, कुठे खेळला जाईल, संपूर्ण वेळापत्रक येथे पहा
IND vs ENG, 4th T20I: राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताला इंग्लंडकडून 26 धावांनी पराभव पत्करावा लागला. 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने नियमित अंतराने विकेट गमावल्या. या सामन्यात हार्दिक पंड्याने 40 धावा करुन बाद झाला . चौथा महत्त्वाचा सामना कधी आणि कुठे खेळला जाईल ते जाणून घेऊया.
भारताच्या या पराभवामुळे इंग्लंडला पाच सामन्यांच्या मालिकेत स्पर्धेत टिकून राहण्याची संधी मिळाली आहे. इंग्लंडकडून बेन डकेटने 51 धावा केल्या तर लियाम लिव्हिंगस्टोनने 24 चेंडूत 43 धावा केल्या. वरुण चक्रवर्तीने सामन्यात पाच विकेट्स घेतल्या. इंग्लंडने 20 षटकांत 9 बाद १७१ धावा केल्या. पाच सामन्यांची मालिका आता 2-1 अशी बरोबरीत आहे.

फोटो सौजन्य- पीटीआय
दरम्यान वरुण चक्रवर्तीच्या अचूक गोलंदाजीमूळे इंग्लंडने सात षटकांत सात गडी गमावले. 14 महिन्यांनंतर भारतीय संघात परतल्यानंतरही वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला एकही विकेट मिळवता आली नाही.
भारत-इंग्लंडमधील चौथा सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील चौथा सामना 31 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू सामना सुरु होईल. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल.
भारत आणि इंग्लंडमधील चौथा सामना कुठे पाहायचा?
या मालिकेतील सर्व सामने भारतात डिस्ने+ हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहेत. यूकेमधील प्रेक्षक टीएनटी स्पोर्ट्स आणि डिस्कव्हरी+ वर ही मालिका पाहू शकतात.
भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 मालिका 2025 संघ
भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या आणि ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).
इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वूड, रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन आणि आदिल रशीद.












Click it and Unblock the Notifications