रोहित शर्मा अहमदाबादमध्ये इतिहास रचण्यास सज्ज ! सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम धोक्यात
IND vs ENG 3rd ODI: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अजिंक्य आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघांमधील एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना 12 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना जिंकून भारतीय संघ इंग्लंडविरुद्धची मालिका क्लिन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल.
रोहित शर्माला इतिहास रचण्याची संधी
जर रोहित शर्मा तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 13 धावा करू शकला तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11000 धावा पूर्ण करेल. सध्या तो फक्त 13 धावा दूर आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहीत इतिहास रचू शकतो. रोहित शर्माची फलंदाजी आणि त्याचा उत्कृष्ट फॉर्म पाहता तो पुढील सामन्यातच ही कामगिरी करेल अशी शक्यता आहे.

फोटो सौजन्य- पीटीआय
रोहित सचिन-कोहलीच्या क्लबमध्ये सामील होणार
एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 11 हजार धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. कोहलीने 2019 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान ही कामगिरी केली होती. यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव येते. 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध 284 वा सामना खेळताना सचिन तेंडुलकरने 11000 एकदिवसीय धावा पूर्ण केल्या होत्या. सचिन आणि कोहलीनंतर आता रोहित शर्मा या क्लबमध्ये सामील होण्यास सज्ज झाला आहे.
रोहित आफ्रिदीचा विक्रम मोडू शकतो
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा फलंदाज बनला आहे. त्याने आतापर्यंत 258 डावांमध्ये 338 षटकार मारले आहेत. यापूर्वी पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने 369 डावांमध्ये 351 षटकार मारले होते .
आफ्रिदीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आहे. रोहित शर्माचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे आणि त्याच्या फलंदाजीच्या शैलीमुळे तो एक उत्तम फलंदाज बनला आहे. येत्या सामन्यांमध्ये त्याला शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडण्याचीही संधी असेल.












Click it and Unblock the Notifications