Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना कधी आणि कुठे होणार; कुठे लाईव्ह बघाल? कोणता संघ प्रबळ? वाचा

IND vs ENG 2nd test match : भारत आणि इंग्लड यांच्यात आता दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. इंग्लडमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत लिड्स येथील हेडींग्ले मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला. चार दिवस दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने पाचव्या दिवशी मात्र पिछेहाट झाली आणि इंग्लडने शानदार विजय मिळवला.

लीड्समध्ये झालेला भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना क्रिकेट इतिहासात नेहमीच लक्षात राहील. कारण या सामन्यात भारत जिंकण्याची शक्यता असतानाही हरला. या सामन्यात भारतीय प्रमुख फलंदाजांनी शानदार कामगिरी केली, तरीही गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे हार पत्करावी लागली.

IND vs ENG 2nd test match

भारतीय संघाला गाळावा लागेल घाम

लिड्स येथील पराभवाची मिमांसा भारतीय संघ सध्या करत आहे. या सामन्यात कोणते चुकीचे निर्णय घेतले. काय डावपेच आखायला हवे होते याचे मंथन आता संघात सुरु आहे पण दुसरीकडे आता पुढच्या कसोटी सामन्याची तयारीही भारतीय संघाला करावी लागणार आहे. त्यासाठीही भारतीय संघाला चांगलाच घाम नेट प्रॅक्टीसमध्ये गाळावा लागणार आहे. एवढेच नाही तर डावपेचही आखावे लागतील.

भारतीय संघ दुसरा कसोटी सामना जिंकेल का?

नवखा कर्णधार असलेल्या शुभमन गिलकडे अनुभवाची कमतरता आहे हे पहिल्या कसोटीत सिद्ध झाले. त्यामुळे आता भारतीय संघात काही बदल केले जाऊ शकतात. ज्याआधारे संघ आणखी मजबूत होईल. हे जरी खरे असले तरीही सामन्याचे पाच दिवस गाजवावे लागतील तरच भारतीय संघाला विजयश्री खेचून आणता येईल.

इंग्लड संघाची बलस्थाने

  • इंग्लडचा संघ मायदेशी त्यांच्या घरच्या मैदानावर खेळत आहे.
  • घरच्या मैदानाचा इंग्लडला फायदा दिसत आहे.
  • इंग्लड संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत.
  • भारतीय संघाच्या तुलनेत इंग्लडचा संघ मजबूत वाटत असून हे पहिल्या कसोटीनंतर सिद्ध झाले आहे.
  • नवखा कर्णधार शुभमन गिलच्या अनुभवाची कमतरता हे इंग्लडसाठी बलस्थान आहे.

दुसरा कसोटी सामना कधी आहे, सामन्याची वेळ काय?

भारतीय वेळेनुसार (IST) हा सामना 2 जुलै 2025 दुपारी 3:30 वाजता सुरू होईल.

दुसरा कसोटी सामना कुठे खेळला जाईल?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथील प्रसिद्ध एजबॅस्टन स्टेडियमवर खेळला जाईल.

दुसरा कसोटी सामना कुठे पाहता येईल?

भारतात, हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. ऑनलाइन स्ट्रीमिंग JioCinema आणि Hotstar Apps आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. जिथे चाहते सामना सहजपणे थेट पाहू शकतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+