IND vs BAN : विराट कोहलीने केले स्टेडियमचे नुकसान केले, धारदार शॉटने भिंतीचा भाग तोडला! फोटो व्हायरल
IND vs BAN : बांगलादेश संघाविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. त्यापुर्वी भारताचे दोनदिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. चेन्नईतील या शिबिरात भारतीय खेळाडू सराव करत आहेत. या सराव शिबिरात कोहलीने जोरदार फटका मारला अन् भिंतीला जाऊन चेंडू आदळला पण पाहतो तर काय...भिंतीला चक्क छिद्रच पडलं
कोहली जोरदार फार्मात असल्याचे हे द्योतक आहे तर आता या शाॅर्टची आणि पडलेल्या छिद्राची सोशल मीडियावर चांगली चर्चा होत असून फोटोही व्हायरल झाला आहे.

फोटो व्हायरल
प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत खेळाडू मेहनत करताना दिसत आहेत. सीनियर खेळाडूही घाम गाळत आहेत. विराट कोहलीने जोरदार फलंदाजी केली, आकर्षक फटके मारले आणि लयीत दिसला. त्याचा एक फोटोही व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तो प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत बोलताना दिसत आहे.
भिंतीला पडले छिद्र
लंडनमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवल्यानंतर कोहली मैदानात परतला आहे. सराव सत्रादरम्यान घडलेली एक घटना चर्चेचा विषय बनली आहे. याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. खरंतर, विराट कोहलीच्या बॅटमधून एक शक्तिशाली शॉट आला जो ड्रेसिंग रूमच्या समोरच्या पातळ भिंतीवर आदळला. ही भिंत काचेची असावी असे वाटत होते. या भिंतीला पडलेले छिद्र आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
कोहलीच्या जोरदार बॅटींग आणि शानदार फटकेबाजीमुळे या भिंतींचे नुकसान झाले. मात्र, चाहत्यांना आनंद आहे की कोहली चांगलाच फार्मात आहे आणि मालिकेदरम्यान त्याच्या बॅटने धावा करणे त्याच्यासाठी महत्त्वाचे आहे.
विराट कोहली सामन्यासाठी सज्ज
विराट कोहलीने सातत्यपूर्ण फलंदाजी केली आहे. रविवारच्या नेट सत्रात विराट कोहलीने 45 मिनिटे फलंदाजी केली. श्रीलंकेत एकदिवसीय मालिका खेळल्यानंतर कोहली लंडनला रवाना झाला. आता तो रेड बॉल क्रिकेटमध्ये आपली प्रतिभा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.
चेन्नईत 19 सप्टेंबरपासून IND vs BAN सामने
चेन्नई येथे 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची मालिका होणार आहे. भारतीय क्रिकेट चाहते या आगामी हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पहिला सामना ऐतिहासिक एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार असून, येथील सामना पाहण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते.
चेन्नईत यापूर्वी 2023 च्या आयपीएल फायनल आणि 1998 च्या कसोटी सामन्यासह अनेक महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धा झाल्या आहेत. या मोसमात क्रिकेटप्रेमींना रोमांचक सामन्यांची अपेक्षा असून स्टेडियममधून सामना पाहण्याची एक वेगळीच मजा आहे. पहिल्या सामन्याच्या तिकीटांची विक्री सुरू झाली आहे.












Click it and Unblock the Notifications